ASUS लवकरच लॉन्च करणार ROG Phone 8; काय फीचर्स मिळणार?

टाइम्स मराठी । Asus कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत  नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या अपकमिंग स्मार्टफोनचे नाव Asus ROG PHONE 8 असं असून त्याचा टिझर कंपनीने सोशल मीडिया हँडलवर लॉन्च केला आहे. यापूर्वी कंपनीने ROG PHONE 7 हा फोन लॉन्च केला होता. हा कंपनीचा गेमिंग फोन होता. परंतु आता लॉन्च करण्यात आलेला ASUS ROG PHONE 8 हा गेमिंग फोन नसून बियॉन्ड गेमिंग असेल. म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये गेमिंग सोबतच वेगवेगळे फीचर्स देखील मिळतील. आज आपण जाणून घेऊया लॉन्च करण्यात येणाऱ्या या मोबाईलचे फीचर्स.

   

टिजर

ASUS ROG PHONE 8 या फोनचा ऑफिशियल टीजर लॉन्च केला आहे. या टीजरनुसार  या फोनच्या बॅक पॅन चे डिझाईन दिसत आहे. या टीजरमध्ये coming soon टॅग दिले आहे. म्हणजेच लवकरच हा फोन लॉन्च होऊ शकतो. सध्या तरी कंपनीने  फोनचे स्पेसिफिकेशन बद्दल खुलासा केला नसला तरी लॉन्च करण्यात आलेल्या टिजर वरून अंदाज लावता येऊ शकतो.

डिझाईन 

ASUS ROG PHONE 8 या अपकमिंग  फोनची डिझाईन जुन्या मॉडेल प्रमाणेच आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर ब्रॅण्डिंग हायलाईट करण्यात आले आहे. यासोबतच बॅक पॅनलवर चौकोन आकारामध्ये कॅमेरा मॉड्युल देण्यात आले आहे. बॅक पॅनलवर उपलब्ध असलेली डिझाईन अप्रतिम असून 3 कलर ऑप्शन मध्ये हा फोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. कारण टिजर मध्ये कंपनीने 3 फोन वेगवेगळ्या कलर मध्ये दाखवले आहेत.

स्पेसिफिकेशन

ASUS ROG PHONE 8 या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर मिळू शकते. यासोबतच कंपनी ROG PHONE सिरीज मध्ये ROG phone 8 ROG phone 8 Pro, ROG Phone 8 ultimate हे फोन लॉन्च करण्यात येऊ शकतात. ROG Phone 8 ultimate या फोनमध्ये 24GB रॅम मिळण्याची शक्यता आहे. हे फोन अँड्रॉइड 14 वर बेस्ड ROG UI वर काम करेल.