Asus लवकरच लॉन्च करणार गेमिंग स्मार्टफोन; मिळणार ‘हे’ खास फीचर्स

टाइम्स मराठी । लवकरच भारतीय बाजारपेठेत Asus कंपनीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. हा नवीन स्मार्टफोन गेमिंग सिरीज मध्ये उपलब्ध होईल. Asus कंपनीने हाच स्मार्टफोन मागच्या वर्षी अपग्रेड सिरीजच्या माध्यमातून ग्लोबली लॉन्च केला होता. आता Asus भारतीय बाजारपेठेत  ROG PHONE 8, ROG PHONE 8 PRO, ROG PHONE 8 ultimateहे तीन मॉडेल लॉन्च करेल. या गेमिंग सिरीज मध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात येऊ शकतात. हा स्मार्टफोन नुकताच सर्टिफिकेशन साईट  Geekbench वर स्पॉट करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन चिनी सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. यामुळे या मोबाईल मधील बरेच फीचर्स उघड झाले आहे.

   

स्टोरेज

ROG Phone 8 Ultimate हा स्मार्टफोन 5G नेटवर्क सपोर्ट सह उपलब्ध होऊ शकतो. यासोबतच स्मार्टफोनमध्ये 16 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज सपोर्ट देण्यात येईल. याशिवाय कंपनी 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट देखील लॉन्च करणार आहे. काही दिवसांपूर्वी क्वालकॉम ने लॉन्च केलेले नवीन AI फीचर ने सुसज्ज प्रोसेसर या स्मार्टफोन मध्ये वापरण्यात येणार आहे. जेणेकरून हा मोबाईल 25 टक्के जास्त अप्रतिम परफॉर्मन्स देईल.

स्पेसिफिकेशन

ROG Phone 8 Ultimate या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये 6.78 इंच चा FHD AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले हाय रिफ्रेश रेट ला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टीम मिळेल. या गेमिंग स्मार्टफोन सिरीज मध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात येऊ शकते. ही बॅटरी 65W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

कॅमेरा

ROG Phone 8 Ultimate या नवीन मोबाईल मध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा, 13 MP अल्ट्राव्हाइड कॅमेरा, 8 MP मायक्रोसेंसर, 32 MP फ्रंट कॅमेरा मिळेल. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या ROG PHONR 7 ची किंमत 74,999 रुपये होती. आणि Ultimate व्हेरिएंटची किंमत 99,999 रुपये  एवढी होती. आता या नवीन स्मार्टफोनची किंमत लॉन्च झाल्यानंतर समजेल.