ASUS Zenbook 14 OLED : 32GB रॅमसह Asus ने लाँच केला नवा Laptop; मिळतात AI फीचर्स

ASUS Zenbook 14 OLED : प्रसिद्ध ब्रँड Asus ने बाजारात एक नवा लॅपटॉप लाँच केला आहे. ASUS Zenbook 14 OLED असे या लॅपटॉपचे नाव असून यामध्ये अनेक AI फीचर्स मिळतात. कंपनीने ASUS Zenbook 14 OLED चे एकूण ७ मॉडेल्स लाँच केले आहेत. आज आपण या लॅपटॉपचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.

   

फीचर्स – ASUS Zenbook 14 OLED

ASUS Zenbook 14 OLED मध्ये कंपनीने 14 इंचाची स्क्रीन दिली आहे. या स्क्रिनचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिझोल्यूशन 3K (2880 x 1800) इतकं आहे. हा डिस्प्ले 16:10 आस्पेक्ट रेशो आणि 600 nits पर्यंत ब्राइटनेससह येतो. Asus ने आपल्या या लॅपटॉप मध्ये Intel Core Ultra प्रोसेसर दिला आहे. हा लॅपटॉप दिसायला अगदी स्लिम आणि हलकाफुलका आहे. लॅपटॉपचे वजन अवघे 1.2 किलो असून तुम्ही अगदी आरामात तो कुठेही घेऊन जाऊ शकता. ASUS Zenbook 14 OLED मध्ये 32GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.

अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, ASUS Zenbook 14 OLED मध्ये २ थंडरबोल्ट 4 पोर्ट, एक USB-A 3.2 पोर्ट, एक HDMI पोर्ट, 3.5mm जॅक, डॉल्बी अॅटमॉस सराउंड साऊंड, स्टिरिओ स्पीकर यांसारखे फीचर्स मिळतात. ASUS Zenbook 14 OLED या लॅपटॉप मध्ये 75Wh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 65W USB Type-C चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की लॅपटॉप एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर तब्बल 15 तासांपर्यंत आरामात चालेल.

किंमत किती?

ASUS Zenbook 14 OLED च्या किमती त्याच्या व्हेरिएन्टनुसार वेगवेगळ्या आहेत. कंपनीने हा लॅपटॉप एकूण ७ व्हेरियेण्ट मध्ये लाँच केला आहे. या लॅपटॉपच्या बेस मॉडेलची किंमत 99,990 रुपये आहे तर टॉप मॉडेलची किंमत 1,09,990 रुपये आहे.