ASUS Zenfone 11 Ultra : 16GB रॅमसह ASUS ने बाजारात आणलाय मजबूत मोबाईल

ASUS Zenfone 11 Ultra : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Asus ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन ASUS Zenfone 11 Ultra लॉन्च केला आहे. या दमदार स्मार्टफोनमध्ये महाशक्तीशाली 16GB ची RAM आणि फोटोग्राफीसाठी 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. सध्या हा स्मार्टफोन भारतात नव्हे तर जागतिक बाजारात लाँच करण्यात आला असून त्याची किंमत $899 म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 74,500 रुपये आहे. आज आपण Asus च्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात…

   

6.78 इंचाचा डिस्प्ले –

ASUS Zenfone 11 Ultra मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा FHD+ LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला Gorilla Glass Victus 2 प्रोटेक्शन मिळतंय. कंपनीने या मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर बसवला असून या स्मार्टफोन मध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे.

कॅमेरा- ASUS Zenfone 11 Ultra

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, ASUS Zenfone 11 Ultra मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 32MP चा टेलीफोटो लेन्स आणि 13MP चा अल्ट्रावाइड कॅमेराचा समावेश आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 65W फास्ट वायर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

हा स्मार्टफोन अमेरिका, युरोप आणि आशियातील काही ठराविक देशांमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेज आणि 16GB RAM + 512GB स्टोरेज अशा २ व्हेरियन्ट मध्ये हा मोबाईल उपलब्ध असून त्याची किंमत $899 म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 74,500 रुपये इतकी आहे.