Ather 450 Apex इलेक्ट्रिक स्कूटर Warp+ राइडिंग मोडसह लाँच

टाइम्स मराठी । सध्या बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती असून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य देत असतात. त्यामुळे मार्केट मध्येही सर्वच कंपन्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत असून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अपडेटेड फीचर्ससह नवनवीन गाड्या बाजारात येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध Ather ने आपली 450 Apex इलेक्ट्रिक स्कूटर Warp+ राइडिंग मोडसह लाँच केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1.89 लाख रुपये ठेवली आहे.

   

Ather 450 Apex या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने PMSM 7Kw चा बॅटरी पॅक दिला आहे. ही बॅटरी 9.3 bhp पॉवर आणि 26 Nm टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक स्कुटर पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास 45 मिनिटे लागतात, परंतु एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 157 किलोमीटर पर्यंत अंतर पार करते असा दावा कंपनीने केला आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरचे टॉप स्पीड 100 किमी प्रतितास असून अवघ्या 2.9 सेकंदात ही स्कुटर 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवण्यास सक्षम आहे. Ather 450 Apex च्या अपडेटेड व्हर्जन मध्ये 5 वर्षांसाठी 60,000 किमी बॅटरीची वॉरंटी मिळेल.

Ather 450X स्कूटरमध्ये असलेला वार्प राइडिंग मोड Warp+ राइडिंग मोडमध्ये बदलण्यात आला आहे. यात TrueRangeT, SmartEcoTM, Eco, Ride, Sport, Warp+ मोड आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर मल्टी लेव्हल ब्रेक रिजनरेशनसह लाँच करण्यात आली आहे. 450 Apex मध्ये, ब्रेकला हात न लावता स्कूटरचा वेग कमी करण्यासाठी तुम्ही एक्सीलरेटरला 15 डिग्री मागे फिरवू शकता, या फीचर्सला कंपनीने ‘मॅजिक ट्विस्ट’ नाव दिले आहे.