Ather 450S HR लवकरच होणार लाँच; 150 KM रेंज मिळण्याची शक्यता

टाइम्स मराठी । आज- काल इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात चलती आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांचा आणि तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे सर्वच इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपन्या एकापेक्षा एक भारी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Ather Energy 450S या इलेक्ट्रिक स्कूटर नंतर आणखीन एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर च नाव Ather 450S HR असं आहे .

   

बॅटरी

मिळालेल्या माहितीनुसार, Ather 450S HR ही इलेक्ट्रिक स्कूटर तीन पर्मनंट मॅग्नेट सिक्रोनस मोटरमध्ये लॉन्च होऊ शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 7.24 bhp पावर जनरेट करेल. Ather 450S HR मध्ये 3.7 kwh बॅटरी पॅक उपलब्ध करण्यात येऊ शकतो. ही बॅटरी एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 150 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. यावेळी स्कुटरचे टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रतितास इतकं असेल. कंपनी या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये इको, स्मार्ट, स्पोर्ट यासारखे तीन रायडींग मोड्स देण्यात येतील.

फिचर्स– Ather 450S HR

Ather 450S HR या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात येऊ शकतात. एवढेच नाही तर या इलेक्ट्रिक स्कूटरचा लुक देखील अप्रतिम असेल असं सांगण्यात येत आहे. त्यानुसार यामध्ये LCD कलर डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन कंट्रोल, म्युझिक प्ले बॅक, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन यासारखे फीचर्स देण्यात येऊ शकतात.

किंमत किती असेल?

अथर 450S HR या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 1.26 लाख पासून ते 1.28 लाख रुपये असू शकते. Ather कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेमध्ये लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे.