Ather Electric Scooter फक्त 14 हजारांत घरी घेऊन जा; 146 KM रेंज

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बरेच जण इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी पसंती देत आहेत. या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये Ather कंपनीच्या स्कुटर ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीला येतात, परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर वर देण्यात येणारी सबसिडी रद्द केल्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर चे भाव वाढले होते. त्यातच Ather कंपनीच्या स्कुटरचा दर्जाही चांगला असल्याने तिची किंमतही जास्त आहे त्यामुळे अनेक ग्राहक इच्छा असूनही पैशाच्या कमतरतेमुळे Ather ची इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू शकत नाहीत. मात्र तुम्ही कमी पैशात Ather 450X खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला एक जबरदस्त ऑफर सांगणार आहोत.

   

Ather 450X ची किंमत 1.28 लाख ते 1.49 लाख रुपयांपर्यंत आहे.त्यामुळे इतकी मोठी किंमत सर्वसामान्य मी,माणसाला नक्कीच परवडत नाही. परतू अशावेळी तुम्ही लोनच्या माध्यमातून ही इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला 14000 रुपयांचे डाउनपेमेंट करावं लागेल तसेच 9.7 टक्के व्याजदराने तीन वर्षांसाठी 3,910 रुपये प्रति महिना हप्ता भरावा लागेल. याबाबतची अधिक माहिती जणू घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या एथर डीलरशिपला भेट देणे आवश्यक आहे.

146 किलोमीटर रेंज –

Ather 450X 6.2 kW मोटर आणि 3.7kWh लिथियम-आयन बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या ५ तासांत फुल्ल हर्ज होते. एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर 146 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. Ather 450X चे टॉप स्पीड 90kmph आहे.

Ather 450X चे अन्य फीचर्स –

या स्कूटर मध्ये असलेल्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये एलईडी हेडलाईट, 7 इंच चा टीएफटी, हिल असिस्ट, ब्लूटूथ कम्पेबिलिटी, म्युझिक आणि कॉल डिस्प्ले, ऑटो इंडिकेटर ऑफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, डॉक्युमेंट स्टोरेज ओटीए (ओव्हर द एयर) अपडेट आणि रिमोट चार्ज मॉनिटरिंग यासारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

Auther 450X या स्कूटरची सीट हाईट 780 mm एवढी असून ही स्कूटर 2 व्हेरियंट आणि 6 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. Auther 450X या स्कूटरच्या टायर ची साईज ही 12 इंच असून यामध्ये संयुक्त ब्रेकिंग सिस्टीम आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सह यात रियर डिस्क ब्रेक दिलेला आहे. या स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 1.28 लाख रुपये तर 1.49 लाख रुपयांपर्यंत आहे.