Ather लाँच करणार नवीन Electric Scooter; Ola ला देणार टक्कर

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. त्यानुसार भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये बरेच वाहन लॉन्च करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिस्पर्धा बघायला मिळते. आता मार्केटमध्ये लवकरच आणखीन एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी Ather कंपनी 450 Apex ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर Ola ला टक्कर देऊ शकते.

   

टीजर Video मधून मिळाली माहिती

Ather कंपनीने या अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटरचा टीजर ट्विटर या सोशल मीडिया हँडलवर जारी केला आहे. हा टीजर व्हिडिओ बेंगलोर स्थित टू व्हीलर इलेक्ट्रिक वाहन निर्माता स्टार्टअप कंपनीचे सह संस्थापक तरुण मेहता यांनी  शेअर केला. या टीझर व्हिडिओच्या माध्यमातून  Ather Energy 450 या इलेक्ट्रिक स्कूटर च्या रायडिंग एक्सपिरीयन्स बद्दल माहिती देण्यात आली. कंपनीला 10 वर्ष पूर्ण होणार असल्यामुळे कंपनी 450 रेंज वाल्या स्कूटर्सला पुढे नेण्यासाठी वाटचाल करत असल्याचं तरुण मेहता यांनी सांगितलं.

बाकीच्या मॉडेल पेक्षा देईल जास्त रेंज

Ather Energy 450 Apex ही 2024 च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते. Ather कंपनीची ही फास्टेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर असेल. सध्या मार्केटमध्ये  OLA S1 PRO ही फास्टेस्ट स्कुटर उपलब्ध आहे. 450 अपेक्स ही स्कूटर लॉन्च झाल्यानंतर ओला कंपनीच्या OLA S1 PRO ला टक्कर देईल. ही इलेक्ट्रिक स्कूटर Ather च्या बाकीच्या मॉडेल पेक्षा जास्त रेंज देईल.

स्पेशल एडिशन मॉडेल असल्याची शक्यता

Ather Energy 450 या इलेक्ट्रिक स्कूटर च्या टीझर व्हिडिओमध्ये स्कूटरचे ट्रान्सपरंट पॅनल्स दिसत आहेत. ही अपकमिंग स्कूटर नवीन जनरेशन 450 एक्स स्पेशल एडिशन मॉडेल असेल. या इलेक्ट्रिक स्कूटर च्या स्पेसिफिकेशन बद्दल अजून कोणतीच माहिती मिळालेली नाही. या स्कूटर ची स्पीड सर्वात जास्त असल्याचा दावा करण्यात येत आहे. या स्कूटर च्या हार्डवेअर मध्ये बरेच अपडेट दिसू शकतात. कंपनीकडून स्कूटर च्या बऱ्याच सॉफ्टवेअर मध्ये अपग्रेड देखील करण्यात येऊ शकते.

फिचर्स

Ather Energy 450 या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये  डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात येऊ शकते. या स्कुटरच्या ग्राफिक्स मध्ये देखील बऱ्यापैकी बदल बघायला मिळतील. कंपनी चार्जिंग टाइमिंगवर भर देत असून चार्जिंग टाइमिंग मध्ये देखील बदल दिसू शकतात.