Ather Rizta : 160 KM रेंजसह Ather ने लाँच केली नवी इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत

टाइम्स मराठी । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मोठी चलती आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदीला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Ather ने बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कुटर आणली आहे. Ather Rizta असे या स्कुटरचे नाव असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती तब्बल 160 किलोमीटर अंतर पार करते. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात.. …

   

Ather Rizta च्या लूक आणि डिझाईनबाबत सांगायचं झाल्यास, इतर इलेक्ट्रिक गाड्यांप्रमाणे अथरच्या या स्कुटरला सुद्धा अतिशय आकर्षक लूक देण्यात आलाय. यामध्ये 56 लीटर स्टोरेज स्पेस देण्यात आलं असून तुम्ही तुमच्या साहित्य त्यामध्ये ठेऊ शकता. स्कुटरवर दोन लोक अगदी आरामात बसतील अशी रचना करण्यात आली आहे. तसेच जास्ती उंचीच्या माणसाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे राईड करता येईल.

160 किलोमीटर रेंज – Ather Rizta

Ather Rizta S व्हेरियन्टमध्ये 2.9 kWh बॅटरी देण्यात आला असून Rizta Z व्हेरियन्टमध्ये 3.7 kWh बॅटरी देण्यात आली आहे. यातील 2.9 kWh बॅटरी पॅकसह येणारी इलेक्ट्रिक स्कुटर एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर 123 किमी अंतर पार करते तर 3.7 kWh बॅटरी पॅकसह येणारी स्कुटर 160 किलोमीटर पर्यंत रेंज देते. तसेच या दोन्ही इलेक्ट्रिक स्कुटरचे टॉप स्पीड 80 किमी प्रतितास इतका मर्यादित आहे.

किंमत किती?

या इलेक्ट्रिक स्कुटरच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Rizzta S ची किंमत 1.10 लाख रुपये आहे. तर Rizta Z व्हेरिएन्टची सुरुवातीची किंमत 1.25 लाख रुपये आणि टॉप-एंड Rizzta Z ची किंमत 1.45 लाख रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरच्या लौंचिंग सोबत Ather ने Halo हेल्मेट देखील सादर केले, Halo Bit ची किंमत 4,999 रुपये आहे तर Halo ची किंमत 14,999 रुपये आहे, प्री-ऑर्डरवर उपलब्ध Rs 2,000 च्या सवलतीसह.