ATM कार्डवर 16 अंकी नंबर कशासाठी असतो? प्रत्येक नंबरमागील नेमका अर्थ काय?

टाइम्स मराठी | आज -काल बँकेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या चकरा मारणे बंद झालेला आहे. कारण डिजिटल बँकिंगमुळे सर्वजण ATM मधूनच पैसे काढून घेतात, जेणेकरून वेळ आणि मेहनत वाचते. सध्या नेट बँकिंगचे जग सुरू आहे. त्यामुळे आज -काल बँकेत जाण्याची गरज पडत नाही. अर्जंट पैसे हवे असेल तर एटीएम मध्ये जाऊन 2 मिनिटाच्या आत पैसे काढले जातात. त्यापेक्षाही सोपं म्हणजे ऑनलाइन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण केली जाते. ज्यामुळे टाईम आणि बाहेर जाण्याची गरज पडत नाही.

   

आपण डिजिटल बँकिंग साठी एटीएम वापरतो. एटीएम ला एनी टाईम मनी असं म्हटलं जातं. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड आवश्यक असतं. ते अतिशय सोयीस्कर आणि सोपं आहे. पण तुम्हाला एटीएम कार्ड वर असलेला हा 16 अंकी नंबर नेमकं काय आहे हे माहिती आहे का? हा अतिशय महत्त्वाचा नंबर असून याचा संबंध डायरेक्ट बँक खात्याशी जोडलेला असतो.

प्रत्येक नंबर मागील अर्थ काय?

या 16 अंकांपैकी पहिला अंक हा कनेक्ट असलेल्या उद्योगाशी किंवा इंडस्ट्री संबंधित असतो. त्याला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायर असं म्हणतात. हे आकडे प्रत्येक उद्योगासाठी वेगवेगळे असतात. पुढील 5 अंकाना इश्यूर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतात. हे कार्ड कोणत्या कंपनीचे आहे हे यातून समजते. त्याचबरोबर 7 व्या अंकापासून ते 15 व्या अंकापर्यंत बँक अकाउंट बद्दलची माहिती असते. पण तो अकाउंट नंबर नसून अकाउंट नंबर ला लिंक केलेला असतो. आणि सर्वात शेवटचा अंक म्हणजेच सोळावा अंक हा एटीएम कार्ड ची व्हॅलिडीटी दर्शवतो. या सोळाव्या नंबरला चेकसम डिजिट देखील म्हणतात.