Audi S5 Sportback Platinum Edition : Audi ने लॉन्च केले S5 स्पोर्टबॅक प्लॅटिनम एडिशन

टाइम्स मराठी । सध्या फेस्टिवल सिझनची धूम सर्वत्र दिसत आहे. त्याचबरोबर दिवाळीसाठी बरेच जण प्लॅनिंग नुसार एखादे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी लगबग देखील करत आहेत. यातच बऱ्याच कार निर्माता कंपन्या देखील त्यांच्या प्रॉडक्टवर फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून डिस्काउंट ऑफर करत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर ऑडी इंडियाने सणासुदीच्या काळात ऑडी S5 स्पोर्टबॅक प्लॅटिनम एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. आज आपण या गाडीचे खास फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

   

स्पेसिफिकेशन

AUDI S5 SPORTBACK PLATINUM EDITION या नवीन कार मध्ये 3.0 लिटर TFSI V6 टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे पेट्रोल इंजिन 354 hp पावर आणि 500 nM पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनमध्ये 8 स्पीड टिप ट्रॉनिक ट्रान्समिशन उपलब्ध केले आहे. यामध्ये सेल्फ ब्लॉकिंग सेंटर डिफरेन्शियल सह क्वाट्रो ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टीम देखील देण्यात आली आहे.

डिझाईन– Audi S5 Sportback Platinum Edition

Audi S5 Sportback Platinum Edition यामध्ये लेझर लाईट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच या कारमध्ये मॅट्रिक्स LED हेडलॅम्प देण्यात आले आहे. यामध्ये ब्लॅक स्टाइलिश पॅकेज ग्रील आणि विंडो ट्रिम वर ब्लॅक एक्सेंट देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर कारच्या एक्स्टर्नल मिरर वर साईड सिल्स सोबतच ॲल्युमिनियम लूक प्रदान करणारी हाऊसिंग देण्यात आली आहे.या कारमध्ये देण्यात आलेले अलॉय व्हील हे एरोडीमिक्स डिझाईन सह उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये S अल्फाबेट असलेल्या रेड ब्रेक कॅलिपर्स देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या नवीन एडिशन कार चा फ्रंट डोअर्स वर S या लोगोसह एलईडी सेल्स वापरण्यात आले आहे.

इंटरियर डिझाईन

Audi S5 Sportback Platinum Edition च्या इंटरियर बद्दल बोलायचं झालं तर, इंटेरियरमध्ये मेगमा रेड कलर ऑप्शन मध्ये नप्पा लेदर अपहोल्स्ट्री  उपलब्ध करण्यात आलं आहे . तसेच यामध्ये मसाज फंक्शनसह स्पोर्ट सीट उपलब्ध आहे. या कारमध्ये पेंडल कॅप आणि फूटरेस्ट मध्ये स्टेनलेस स्टील ट्रीटमेंट वापरण्यात आलं आहे. या कारमध्ये इनलेट मॅट ब्रश अल्युमिनियम चा वापर करण्यात आला आहे.

फीचर

Audi S5 Sportback Platinum Edition च्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये 10.9 इंच  टच स्क्रीन इन्फोटेनमेंट  सिस्टीम देण्यात आलं आहे. यासोबतच तीन झोन क्लायमेट कंट्रोल, 12.2 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हॉइस कंट्रोल, फ्री टेक्स्ट सर्च फंक्शन, कस्टमाईजिबल व्ह्यू मोड मध्ये स्पोर्ट, S परफॉर्मन्स, डायनामिक . 6 चॅनल ऍम्प्लिफायर, दहा स्पीकर, सबवुफर, 180 व्हॉट ऑडिओ सिस्टीम यासारखे फीचर या कारमध्ये देण्यात आले आहे.

किंमत

Audi S5 Sportback Platinum Edition हे ऑडी कंपनीचे तिसरे व्हेरिएंट आहे. यापूर्वी SPORTBACK PLATINUM EDITION Q5 आणि SPORTBACK PLATINUM EDITION Q8 हे व्हेरिएंट लॉन्च केले होते. Audi कंपनीने लॉन्च केलेले हे नवीन एडिशन लिमिटेड युनिट्स मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या कारची किंमत 81,57,000 रुपये एवढी आहे. कंपनीने ही कार डिस्ट्रिक्ट ग्रीन आणि मिथोस ब्लॅक या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केली आहे.