25,000 रुपयांत मिळतेय Electric Scooter; लायसन्सचीही गरज नाही

टाइम्स मराठी । आजकाल इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड कल दिसतो. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढलेल आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांचा लुक आणि डिझाईन यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक गाड्यांकडे आकर्षित होतात. परंतु कमीत कमी खर्चात गाडी खरेदी करण्याकडे ग्राहक आपली पसंती दाखवत असतात. सध्या गाड्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका इलेक्ट्रिक स्कुटरबाबत सांगणार आहोत जिची किंमत फक्त 25,000 रुपये आहे. तसेच पुरुषांसह महिला वर्गाला सुद्धा चालवायला अतिशय सोप्पी अशी हि इलेक्ट्रिक स्कुटर आहे. Avon E Plus असं या गाडीचे नाव असून आज आपण तिचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

Avon E Plus बॅटरी

Avon E Plus या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 220 W मोटर देण्यात आली आहे. Avon E Plus मध्ये 0.57 kwh बॅटरी पॅक देण्यात आली आहे. ही बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी ८ तासांचा वेळ लागतो. परंतु एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर Avon E Plus ही इलेक्ट्रिक स्कूटर 50 km पर्यंत रेंज देते. याशिवाय या इलेक्ट्रिक स्कूटरचे टॉप स्पीड 24 kmph इतकं आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज नाही.

Avon E Plus फीचर्स

Avon E Plus या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सिंगल सीट देण्यात आले आहे. यामुळे कम्फर्टेबल वाटू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या समोरील बाजूस फ्लॅट फूट रेस्ट, मागच्या साईडने बूट स्पेस बॉक्स देण्यात येतो. या बूट स्पेस बॉक्स मध्ये तुम्ही हेल्मेट सहजपणे ठेवू शकतात. म्हणजेच बूट स्पेस बॉक्स मध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खास म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये पेंडल देखील देण्यात आले आहे. म्हणजे जर तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी संपली तर तुम्ही सहजतेने पँडलच्या मदतीने तुमचे इलेक्ट्रिक स्कूटर ड्राईव्ह करू शकतात.