टाइम्स मराठी । ई-कॉमर्स वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणारी Amazon कंपनीने क्लाऊड कम्युटिंग सर्विस साठी नवीन AI चीप ची घोषणा केली आहे. म्हणजे आता Amazon नवीन AI चिप लॉन्च करणार आहे. ही नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप मायक्रोसॉफ्टला टक्कर देईल. या चिप चे नाव Trainium 2 आहे. ही चिप पुढच्या वर्षी लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या चिप्स सोबतच कंपनीने Graviton4 या क्लाऊड फर्मच्या चौथ्या कस्टम सेंटर प्रोसेसर चीपची देखील घोषणा केली.
काय म्हणाले एडम सेलिप्स्की
लास वेगासमध्ये अमेझॉन वेब सर्विसेस AWS चे चीफ एक्झिक्युटिव्ह एडम सेलिप्स्की यांनी या एआय सिस्टीमला प्रशिक्षित करण्यासाठी डिझाईन केलेल्या सेकंड जनरेशन ट्रेनियम 2 ची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, हे नवीन व्हर्जन जुन्या व्हर्जन पेक्षा अत्यंत ऍडव्हान्स आहे.Trainium 2 ही चिप जुन्या वर्जन पेक्षा 4 पटीने वेगवान असून एनर्जी सेविंग च्या बाबतीत दुप्पटीने चांगली आहे.
क्लाऊड सर्विस वर Nvidia चे नवीन चिपसेट ऑफर करणार
Trainium 2 ही चिप मायक्रोसॉफ्ट सोबत गुगलच्या AI चीप ला देखील टक्कर देईल. मायक्रोसॉफ्ट लॉन्च करणार असलेल्या AI चीप बद्दल काही आठवड्यांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. सध्या क्लाऊड कम्प्युटिंग कंपन्या मार्केट लीडर Nvidia वर अवलंबून न राहण्यासाठी AI चिप सादर करत आहे. यासोबतच AWS आपल्या क्लाऊड सर्विस वर Nvidia चे नवीन चिप सेट ऑफर करणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली.
पुढच्या वर्षापर्यंत लॉन्च होईल चीप
AWS पुढील वर्षी नवीन प्रशिक्षण चिप्स लॉन्च करण्यास सुरुवात करेल. या कस्टम चिप्सचा विस्तार हा मोठ्या भाषा मॉडेल सारख्या टेक्नॉलॉजीचा विकास करण्यासाठी करण्यात येईल. जेणेकरून कंप्युटिंग पॉवर शोधण्यासाठी मदत होईल आणि chat GPT यासारख्या सर्विसचा आधार बनेल असं चीफ एक्झिक्यूटिव्ह सेलिप्स्की यांनी सांगितलं.