रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी ‘बेबी म्यूट मास्क’; असं करेल वर्क

टाइम्स मराठी । लहान बाळ रडायला लागले की ते शांत बसण्याचे नाव घेत नाही. त्याचबरोबर लहान बाळ आई-वडिलांशिवाय दुसऱ्या कोणाकडे जात नाही यामुळे बऱ्याच प्रॉब्लेमला सामोरे जावे लागते. सगळ्यात मोठा त्रास हा वर्किंग वुमन्सला झेलावा लागतो. बाळामुळे वर्क फ्रॉम होम असेल तर ऑफिसचे काम करताना बाळ रडले की मोठा प्रॉब्लेम होतो. या परिस्थितीला हँडल करण्यासाठी एका कंपनीने बेबी म्युट मास्क बाजारात आणले आहे. हे बेबी म्यूट मास्क (Baby Mute Mask) अशा पद्धतीने डेव्हलप करण्यात आले आहे की या मास्क मुळे पालकांमध्ये तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. त्याचबरोबर बऱ्याच पालकांना हे गॅजेट पाहून धक्का बसला आहे.

   

या कंपनीने नोकरी करणाऱ्या किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मातावर लक्ष केंद्रित करून हे गॅजेट बनवलं असेल. बऱ्याचदा ऑफिसची मीटिंग सुरू असताना बाळ रडण्याचा आवाज येतो. त्यावेळी मीटिंग वर लक्ष केंद्रित न करू शकल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स उद्भवतात. यावेळी कामात व्यत्यय येऊ नये यासाठी कंपनीने हे गॅझेट बनवले आहे. कंपनीच्या मते बेबी म्युट मास्क बाळाला घातल्यास ते शांत बसेल. किंवा ते रडत जरी असले तरीही बाळाच्या आवाजाने तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु कंपनीच्या या गॅझेट वर जोरदार टीका होत आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, बेबी म्युट मास्कला या कंपनीने गेम चेंजर म्हटले आहे. या बेबी म्युट मास्क चा जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं आहे की, प्रवास करत असताना बेबी म्युट मास्क च्या मदतीने तुम्ही बाळाला शांत बसवू शकतात. हे मास्क अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहे की, यामध्ये बाळाचे नाव आणि तोंड दोन्ही कव्हर होतील. जेव्हा हे मास्क बाळाचे नाक आणि तोंडावर असेल त्यावेळी बाळ रडले तरीही त्याचा आवाज 87% पेक्षा कमी ऐकू येईल.

बेबी म्युट मास्क बनवणाऱ्या या कंपनीने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टवर त्यांनी कॅप्शन दिले आहे की, ‘इनोव्हेशन ऍट इट्स बेस्ट’. यावर बऱ्याच लोकांनी टीका केली आहे. त्यावर लोक म्हणाले की निष्पाप मुलांवर हा अत्याचार होईल. त्याचबरोबर हा कायदा योग्य नसल्याचं बरेच लोकांनी सांगितलं. तर एक जण म्हणाला की मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासावर देखील परिणाम होऊ शकतो.