Bajaj Avenger Cruise : केवळ 40 हजारांत घरी घेऊन जा जबरदस्त बाईक; रायडींगसाठी आहे बेस्ट

टाइम्स मराठी टीम । सध्या महाविद्यालयांच्या परीक्षा संपून निकाल लागले आहेत. अनेक कॉलेजवयीन मुले नवीन बाईक घेण्याचा विचार करत आहेत. सध्या महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे कि बाईक सोडा साधी सायकल घेणेही मुश्किल झाले आहे. अशामध्ये दुचाकी गाड्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर तुम्ही जर दुचाकी घेण्याचा विचार असाल तर आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त दुचाकी कुठे मिळतील याची माहिती देणार आहोत.

   

तरुणांमध्ये स्पोर्ट बाईक घेण्याचे प्रमाण अधिक असते. अलीकडच्या काळात अनेक प्रकारच्या भन्नाट स्पोर्ट बाईक्स बाजारात आल्या आहेत. यामध्ये TVS, Bajaj, Honda अशा अनेक कंपन्यांनी आपापल्या स्पोर्ट्स बाईक लाँच केल्या आहेत. मात्र नवीन बाईक घेण्यास गेलो तर खूप जास्त किंमत मोजावी लागते. त्यापेक्षा सेकंडहँड गाडी घेतली तर स्वस्तात बेस्ट गाडी मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला बजाज अव्हेंजर या स्पोर्ट्स बाइकबाबत माहिती देणार आहे.

बजाज कंपनीची अव्हेंजर स्पोर्ट्स बाईक केवळ ४० हजार रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. Quikr.com या वेबसाईटवर सदर बाईक विक्रीसाठी असून तुम्हाला यासाठी https://www.quikr.com/bikes-scooters/used-2012-bajaj-avenger-cruise-220-20000-kms-driven-in-karad/p/365441231 इथे क्लिक करून विक्रेत्यांशी संपर्क साधता येईल. तसेच OLX वर सुद्धा २०१५ चे अव्हेंजर मॉडेल ५० हजार रुपयांना उपलब्ध आहे. https://www.olx.in/en-in/item/gadi-good-condition-aahe-iid-1731571391

सेकंड हॅन्ड गाडी घेण्याचे फायदे –

पैशांची बचत होते.
कमी किमतीत चांगली गाडी मिळते.
गाडीचे नवीन मॉडेल आले कि लगेच गाडी बदलता येते.