टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) आणि बाईककडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर आणि बाईक बनवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर या कंपन्या कमी बजेट मध्ये जास्त परफॉर्मन्स देणाऱ्या आणि ग्राहकांना परवडेल अशा इलेक्ट्रिक स्कुटर मार्केट मध्ये आणत आहे. त्यामुळे इलेक्टिक स्कुटर बनवणाऱ्या कंपन्यांमध्येही आता चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बजाज (Bajaj)लवकरच आपली नवी इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करणार आहे. बजाजची ही इलेक्ट्रिक स्कुटर भारतीय बाजारात Ola आणि Ather ला थेट टक्कर देणार आहे.
बजाजच्या या नव्या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव Blade असं आहे. ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नवीन फिचर उपलब्ध व्हावे यासाठी बजाज ऑटोने ही स्कूटर आणली आहे. बजाज ऑटो ने काही महिन्यांपूर्वी चेतकच्या रूपात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च केली होती. त्यानंतर ही बजाजची दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर असू शकते. बजाज ऑटोच्या या नव्या स्कुटर बद्दल अजून कोणतीच अधिकारी घोषणा करण्यात आलेली नसून या स्कूटरच्या टेस्टिंग वेळी तिची झलक पाहण्यास मिळाली. यावरून अंदाज लावण्यात येत आहे की, येणाऱ्या फेस्टिवल सीझनमध्ये ही स्कूटर लॉन्च होऊ शकते.
Ola, Ather, Chetak पेक्षा जास्त फीचर्स-
मिळालेल्या माहितीनुसार या स्कूटरमध्ये मोठा बॅटरी पॅक आणि पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर देण्यात येऊ शकते. एवढेच नाहीतर आणि ओला या इलेक्ट्रिक स्कूटर पेक्षा जास्त पावर, बॅटरी रेंज आणि उत्तम स्पीड, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ट्वीन हेडलॅम्प सेटअप बजाजच्या या नवीन स्कूटर मध्ये दिसू शकते. बजाजची ही स्कूटर एथर आणि ओला या ऑटो निर्माता कंपन्यांना टक्कर देईल. यासोबत चेतक पेक्षा बेस्ट फीचर्स या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात येऊ शकतात.