Bajaj Chetak EV चे 2 नवे व्हेरिएन्ट लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Chetak EV : सध्या इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वळत आहे. त्यामुळे अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक मध्ये बाजारात आणत आहेत. बजाज या प्रसिद्ध कंपनीने सुद्धा चेतकच्या रूपात इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणली होती. आता कंपनीने चेतकचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या व्हेरिएंटचे नाव  ‘चेतक अर्बन’ असं आहे. या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन व्हेरिएंट उपलब्ध केले असून Standard आणि Tecpac या व्हेरिएंटसह ही स्कुटर मार्केट मध्ये लॉन्च करण्यात आली. या न्यूली लॉन्च स्कुटर मध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले असून तुम्हाला यामध्ये परवडेल अशी ड्रायविंग रेंज सुद्धा मिळत आहे. आज आपण जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कुटरचे अपडेटेड फीचर्स आणि स्पेसिफिकेशन. 

   

बॅटरी आणि रेंज– Bajaj Chetak EV

बजाज चेतक अर्बन या स्कूटरमध्ये 2.88 kWh बॅटरी पॅक देण्यात आली आहे. ही बॅटरी अप्रतिम पॉवर देण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरच्या प्रीमियम मध्ये देखील हीच बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरी पॅकमुळे नवीन लॉन्च करण्यात आलेल्या बजाज चेतकची रेंज वाढल्याचे दिसून येते. ही नवीन बजाज चेतक अर्बन पूर्णपणे चार्ज झाल्यास 113 किलोमीटर एवढी रेंज देईल. आणि प्रीमियम व्हर्जन स्कुटर सिंगल चार्जमध्ये 108 किलोमीटर एवढी रेंज देण्यास सक्षम असेल. चेतक अर्बन या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या EV चे टॉप स्पीड 73 किलोमीटर प्रतितास इतकं आहे. आणि प्रीमियम व्हर्जनचे टॉप स्पीड 63 किलोमीटर इतकं आहे.

किंमत किती?

बजाज चेतक अर्बन च्या (Bajaj Chetak EV) स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये कंपनीने फक्त इको हा रायडींग मोड दिला आहे. या स्कुटरच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, चेतक अर्बन या EV स्कुटरच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत  1,15,001 रुपये एवढी आहे. आणि Tecpac व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 1,12,001 रुपये आहे. यासोबतच प्रीमियम व्हर्जनची किंमत 1,15,000 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.