Bajaj Chetak EV : नव्या व्हर्जनमध्ये लाँच झाली Bajaj Chetak EV ; देते 127 KM रेंज

टाइम्स मराठी । भारतीय मार्केट मध्ये सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोल- डिझेलच्या खर्चापासून वाचण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात सुद्धा जवळपास सर्वच कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक अवतारात लाँच करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी बजाजने आपली Bajaj Chetak EV Premium आणि Urbane व्हर्जनमध्ये बाजारात आणली आहे. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

127 KM रेंज –

अपडेटेड नवीन बजाज चेतकमध्ये (Bajaj Chetak EV) पूर्वीच्या मॉडेलप्रमाणे 3.2kWh बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. ARAI च्या सर्टिफिकेट नुसार, एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 127 किलोमीटरपर्यंतचे अंतर आरामात पार करू शकते. यावेळी तिचे टॉप स्पीड ताशी 73 किलोमीटर प्रति तास इतकं असेल. आणि महत्वाचे म्हणजे गाडी चार्ज करण्यासाठी विशेष असं काही करावं लागत नाही. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरसोबत 800-वॉट चार्जर दिला आहे. या चार्जरच्या मदतीने तुम्ही घरबसल्या सहजपणे चार्ज करू शकता.

अन्य फीचर्स – Bajaj Chetak EV

कंपनीने या नव्या बजाज चेतक मध्ये (Bajaj Chetak EV) अनेक बदल केले आहेत. यामध्ये देण्यात आलेल्या फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Bajaj Chetak EV मध्ये 5-इंचाचा TFT डिस्प्ले, म्युझिक कंट्रोल, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, हिल होल्ड फंक्शन, रिव्हर्स मोड, कॉल मॅनेजमेंट, स्टीयरिंग लॉक, हेल्मेट बॉक्स लॅम्प यांसारखे फीचर्स दिले आहेत.

किंमत किती?

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, बजाज चेतकच्या Premium व्हर्जनची किंमत 1.35 लाख रुपये आहे तर Urbane व्हर्जनची किंमत 1.15 लाख रुपये आहे. बजाज चेतकची ही इलेक्ट्रिक स्कुटर मार्केट मध्ये Ola, Ather च्या गाडयांना टक्कर देईल.