पेट्रोल, डिझेलशिवाय चालणारी Bajaj CT 100 लवकरच होणार लॉन्च; किंमत किती?

टाइम्स मराठी । भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच खात्री बसत आहे. अशा परिस्थितीत बाईकमध्ये पेट्रोल भरणे अनेकांना परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ऑटो कंपन्यांनीही आपली भूमिका बदलली आहे. आता बाजारात इलेक्ट्रिक बाईक येताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरात अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या असून ग्राहकांची सुद्धा त्यांना मोठी पसंती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बजाज आपली लोकप्रिय CT 100 ही गाडी सुद्धा लवकरच इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणणार आहे.

   

बजाजची CT 100 बाईक आजकाल सर्वात लोकप्रिय ठरत आहे. भारतीय बाजारपेठेत देखील या बाईकची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. खेड्यापासून ते शहरापर्यंत या बाईकने तरुणांना वेड लावले आहे. CT 100 ला हृदयाची राणी असे देखील म्हणले जाते. यावरूनच तिची लोकप्रियता दिसून येते. त्यामुळे या बाईकशी लोकप्रियता बघता बजाज लवकरच CT 100 चे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणणार आहे. या बाईकमध्ये अनेक वेगवेगळे फीचर्स आणि खास वैशिष्ट्य असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या इलेक्ट्रिक बाइकची किंमत देखील सर्वाना परवडेल अशीच असणार आहे. यामुळे ही बाईक बाजारात सर्वात जास्त लोकप्रिय ठरेल असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.

Bajaj CT 100 फिचर्स

Bajaj CT 100 च्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये ब्लूटूथ, नेव्हिगेशन आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी सारखे अनेक वेगवेगळे फीचर्स असणार आहेत. तसेच बाईकमध्ये अनेक कलर्स देखील उपलब्ध असणार आहेत. बजाजच्या या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 4.4 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला जाईल. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तासांचा वेळ लागेल. परंतु एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ही बाईक 120 ते 150 किलोमीटरची रेंज देऊ शकते.

किती असेल किंमत ?

अद्याप या बाईकच्या लॉन्चिंगची तारीख कंपनीने जाहीर केलेली नाही. बजाज CT 100 बाईक सर्वसामान्य ग्राहकांना सहज घेता यावी यासाठी त्यांची किंमत ८५ हजार ते ८७ हजार रुपयांच्या दरम्यान ठरवण्यात येईल. खास म्हणजे, या बाईकमध्ये अनेक खास विचार उपलब्ध असताना देखील तिची किंमत कमीच ठेवण्यात आली आहे. अद्याप कंपनीने बाईकची फिक्स किंमत देखील जाहीर केलेली नाही. मात्र लवकरच ती जाहीर करण्यात येईल.