टाइम्स मराठी । भारतीय टू व्हिलर बाजारात जास्त मायलेज देणाऱ्या बाईकची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येते. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त मायलेज देणारी गाडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तुम्ही सुद्धा अशाच बाईकच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध कंपनी बजाजच्या CT11OX या गाडीबद्दल सांगणार आहोत. बजाजची ही बाईक तब्बल ७० किलोमीटर पर्यंत रेंज देते. त्यामुळे ग्राहकांनी याला चांगली पसंती दाखवली आहे. बजाजनेही ग्राहकांसाठी खास ऑफर आणत अवघ्या १० हजार रुपयांत बाईक खरेदीची संधी मिळवून दिली आहे. तत्पूर्वी आपण CT11OX चे खास फीचर्स जाणून घेऊयात.
115.45 Cc इंजिन
बजाजच्या CT11OX या बाईकमध्ये ११५.४५ सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सला जोडलेलं असून ८.६ PS ची पॉवर आणि ९.८१ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या स्टायलिश बाइकचा टॉप स्पीड ९० किमी प्रती तास आहे. बाईकला सुरक्षेसाठी पुढील आणि मागील दोन्ही टायरवर ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. जे रायडरला रस्त्यावर सुरक्षित राहण्यास आणि बाइक नियंत्रित करण्यास मदत करतात.
BAJAJ CT11OX बाइक मॅट व्हाइट ग्रीन, इबोनी ब्लॅक-रेड आणि इबोनी ब्लॅक-ब्लू या पेंट कलरमध्ये उपलब्ध आहे. खास म्हणजे या बाईकमध्ये ११ लिटरची इंधन टाकी बसवण्यात आली आहे. यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍबसॉर्बर सेटअप आहे. तसेच गाडीला ट्यूबलेस टायर्स मिळतात.
BAJAJ CT11OX ची किंमत-
ही बाईक बाजारात ५९१०४ ते ६७३२२ किमतीला शोरूममध्ये उपलब्ध आहे. मात्र या बाईकला तुम्ही फक्त १०,००० रुपये देऊन खरेदी करू शकता. या बाईकच्या स्कीमनुसार तुम्हाला ९.७ टक्के व्याजदराने तीन वर्षांसाठी फक्त १९३१ रुपये प्रती महिना हप्ते भरावे लागतील. याचबरोबर डाउन पेमेंट आणि कर्ज योजनेचा कालावधी बदलून मासिक हप्ता बदलणे देखील स्कीममध्ये शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर आजच बुकींग करा.