Bajaj Platina CNG : Bajaj Platina येणार CNG मध्ये; पेट्रोलपासून होणार सुटका

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाईमुळे ग्राहक आता CNG आणि इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे आपली पसंती दाखवत आहेत. अनेक कार आपण CNG मध्ये पाहतोय. तसेच अनेकजण CNG किट बसवून देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध कंपनी Bajaj तिची सुप्रसिद्ध बाइक Bajaj Platina CNG मध्ये लाँच करणार आहे. सध्या कंपनी या बाईकवर काम करत असून लवकरच ही बाईक बाजारात आणली जाणार आहे.

   

2024 मध्ये होणार लाँच- Bajaj Platina CNG

मिळालेल्या माहितीनुसार, Bajaj Platina ही कंपनीची पहिलीवहिली CNG बाईक असेल. कंपनीने या बाईकचे कोड नेम ब्रूजर E101 असे ठेवले आहे. ही बाईक पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च (Bajaj Platina CNG) करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर बजाजच्या औरंगाबाद मध्ये असलेल्या प्लांट मध्ये या बाईकचे प्रॉडक्शन करण्यात येणार आहे.

बजाज ऑटो चे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बजाज यांनी याबाबत म्हंटल की, संपूर्ण देशासमोर टॅक्स आणि प्रदूषण कमी करणे हे एक सर्वात मोठे आव्हान आहे. त्यानुसार आम्ही आमच्या बाईक मध्ये क्लीनर फ्युलचा विस्तार करणार आहोत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहन इथेनॉल, LPG आणि CNG या स्पेक्ट्रम चा समावेश असेल. यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की, भारतीय बाजारपेठेमध्ये CNG स्कूटर किंवा CNG बाईक का उपलब्ध नाही. CNG वर आधारित वाहनासाठी सुरक्षित रेंज सुरक्षा बॅटरी लाईफ आणि चार्जिंग या संबंधित कोणत्याच गोष्टीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. CNG वर चालणारी बाईक सर्व नागरिकांसाठी फायदेशीर आणि चांगली असेल.