Bajaj Pulsar N150 भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेमध्ये Bajaj Pulsar N150 बाईक लॉन्च करण्यात आली आहे. बजाज कंपनीची ही पल्सर बाइक प्रचंड प्रसिध्द आणि तरुणाईच्या मनावर राज्य करणारी आहे. कंपनीच्या नवीन Bajaj Pulsar N150 ला आपण P150 या मॉडेलचे स्पोर्टीयर वर्जन म्हणू शकतो. कंपनीने ही बाईक 1 लाख 17 हजार 677 रुपयांमध्ये लॉन्च केली आहे.

   

डिझाईन

बजाज कंपनीच्या पल्सर N160 या मॉडेलच्या डिझाईन ला मिळती जुळती N150 ही बाईक असून कंपनीने ही बाईक रेसिंग रेड, मेटालिक पर्ल, व्हाईट आणिएबोनी ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केली आहे. या बाईक मध्ये ऍडजस्टेबल स्टेप सीट, एक स्मूथ एक्झॉस्ट आणि फ्लोटिंग बॉडी पॅनल देण्यात आले आहे. कंपनीने या बाईक मध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प देखील उपलब्ध केले आहे. यामुळे या नवीन पल्सरला ॲडव्हान्स वर्जन म्हटले जाते. या बाईक मध्ये अप्रतिम फ्युल टॅंक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यासोबतच या फ्युएल टॅंक वर यूएसबी पोर्ट आणि एक स्पीडोमीटर देखील देण्यात आला आहे.

ग्राफिक्स फिचर्स

Bajaj Pulsar N150 या बाईकच्या ग्राफिक फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये पियर्सिंग कलर ब्रेक सह कन्ट्रास्ट फिनिशिंग देण्यात आलं आहे. ही बाईक 120 क्रॉस सेक्शन रियल टायर्स मध्ये उपलब्ध असून या गाडीचे वजन N160 पेक्षा 7 किलोग्राम एवढे कमी आहे. या बाईक मध्ये समोरच्या साईडने टेलिस्कोपिक युनिट आणि मागच्या साईडने मोनोशॉक सस्पेन्शन उपलब्ध आहे.

इंजिन- Bajaj Pulsar N150

Bajaj Pulsar N150 या बाईक मध्ये 149.68 सीसी चार स्ट्रोक सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 14.5 PS पॉवर आणि 13.5 nm पिक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले आहे. कंपनीने या बाईक मध्ये फ्रंट साईडने सिंगल चैनल ABS सह 240 mm डिस्क आणि रियल मध्ये 130 mm ड्रम ब्रेक दिला आहे.