Bajaj Pulsar N160 and N150 : Bajaj ने अपडेटेड फीचर्ससह लाँच केल्या 2 नव्या बाईक; किंमत किती पहा

Bajaj Pulsar N160 and N150 : प्रसिद्ध दुचाकी उतपादन कंपनी बजाजने भारतीय बाजारपेठेत Bajaj Pulsar N160 आणि Bajaj Pulsar N150 या दोन बाईक अपडेटेड फीचर्स सह लाँच केल्या आहेत. यामधील Bajaj Pulsar N150 काळा आणि पांढरा या २ रंगात उपलब्ध आहे तर Pulsar N160 काळा, निळा आणि लाल अशा ३ रंगात तुम्ही खरेदी करू शकता. आकर्षक लूक आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेल्या या दोन्ही बाईक पाहताक्षणीच तुमच्या मनात बसतील अशाच आहेत. आज आपण या दोन्ही बाईकचे खास फीचर्स आणि त्यांच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

   

फीचर्स

बजाजच्या या गाड्या (Bajaj Pulsar N160 and N150) नव्या बॉडी ग्राफिक्स आणि कलरमध्ये उपलब्ध आहेत. Bajaj Pulsar N150 आणि Pulsar N160 चे अपडेटेड मॉडेल डिजिटल LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने सुसज्ज आहे. हे रायडर्सना बॅटरी लेव्हल, मोबाईल सिग्नल स्ट्रेंथ आणि मोबाईल नोटिफिकेशन अलर्ट यांसारख्या माहितीसह डाव्या स्विच क्यूबवरील एक बटणचा वापर करून कॉल उचलू शकते किंवा कट करू शकते. बाईकच्या LCD डिस्प्लेवर तुम्हाला बाईकचा वेग, इंजिन रेव्ह, सरासरी इंधन कार्यक्षमता, गीअर पोझिशन इंडिकेटर आणि इन्स्टंट फ्युएल इकॉनॉमी यांसारख्या गोष्टी दिसतील.

इंजिन – Bajaj Pulsar N160 and N150

बाईकच्या इंजिन बद्दल सांगायचं झाल्यास, नवीन Pulsar N150 मध्ये पूर्वीप्रमाणेच 149.68cc इंजिन आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सला जोडण्यात आले असून 14.3bhp पॉवर आणि 13.5Nm टॉर्क जनरेट करते. नवीन पल्सर N160 ही बाईक 164.82cc, DTS-I इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 15.8bhp पॉवर आणि 14.65Nm टॉर्क जनरेट करते. पल्सर N160 पारंपारिक फ्रंट फोर्क सेटअपसह येते.

किंमत किती?

दोन्ही बाईकच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Bajaj Pulsar N150 ची किंमत 1,17,677 रुपये आहे, तर Bajaj Pulsar N160 ची किंमत 1,30,560 रुपयांपासून सुरू होतेय. बजाजच्या या दोन्ही गाड्या मार्केट मध्ये TVS Apache RTR 160 4V, Suzuki Gixxer ला टक्कर देतील.