Bajaj Pulsar N250 अपडेटेड फीचर्ससह लाँच; किंमत किती पहा

टाइम्स मराठी । प्रसिद्ध दुचाकी वाहन उत्पादन कंपनी Bajaj च्या गाड्या बाजारात चांगल्याच लोकप्रिय आहेत. आपल्या ग्राहकांना रायडींगचा सुखद आणि चांगला अनुभव यावा यासाठी कंपनी सतत अपडेटेड फीचर्ससह नवनवीन गाड्या मार्केटमध्ये लाँच करत असते. आताही कंपनीने दिसायला आकर्षक आणि दमदार पॉवरने सुसज्ज अशी बाईक मार्केट मध्ये आणली आहे. हि बाईक म्हणजे Bajaj Pulsar N250 चे अपडेटेड मॉडेल.. दिसायला स्पोर्टी लूक आणि मजबूत असलेली ही बाईक बाजारातील कंपन्यांचे टेन्शन वाढवणार हे नक्की… आज आपण बजाजच्या या बाईकचे फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

Bajaj Pulsar N250 च्या अपडेटेड मॉडेल मध्ये 165mm ग्राउंड क्लिअरन्स आणि 14 लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. कंपनीने या बाईकच्या सीटची उंची 5 मिमीने वाढवली आहे तर व्हीलबेस 9 मिमीने कमी केला आहे. बाईकमध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. हे एक एलसीडी युनिट आहे, जे टॅकोमीटर रीडिंग, मायलेज, गाडीचा वेग, इंधन पातळी, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर रीडिंग यासारखी महत्त्वाची माहिती दाखवते .

इंजिन – Bajaj Pulsar N250

गाडीच्या इंजिनबाबत सांगायचं, Bajaj Pulsar N250 मध्ये 249cc, सिंगल-सिलेंडर ऑइल-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सला जोडलं असून 24.1 bhp पॉवर आणि 21.5 Nm टॉर्क जनरेट करते. या बाइकच्या हँडलवरील स्विचगियरही बदलण्यात आला असून नवीन बटणे देण्यात आली आहेत. 2024 Bajaj Pulsar N250 मध्ये रोड, रेन आणि ऑफ-रोड असे ३ रायडींग मोड देण्यात आले आहेत तसेच ब्रेकिंगसाठी ड्युअल चॅनल ABS सह 300 मिमी फ्रंट आणि 230 मिमी मागील पेटल डिस्क ब्रेक आहेत

किंमत किती?

गाडीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास, 2024 Bajaj Pulsar N250 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.51 लाख रुपये आहे. बाजारात ही बाईक TVS Apache RTR 200 4V, Honda Hornet आणि Suzuki Gixxer 250 या गाड्यांशी स्पर्धा करेल.