टाइम्स मराठी | सध्या ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक कडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता जवळपास सर्वच कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी बजाज सुद्धा लवकरच आपली इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे. यापूर्वी बजाजने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर चेतक लाँच केली होती. आता त्याच्या पुढे जाऊन बजाज इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बजाज आता पल्सर किंवा प्लॅटिना याऐवजी केटीएम सारख्या नवी पिढीच्या इलेक्ट्रिक बाइक वर सध्या काम करत आहे. बजाज कंपनीची पल्सर ही सर्वात फेमस मॉडेल असलेली बाईक आहे. त्यानंतर आता बजाज कंपनी ही सुद्धा इलेक्ट्रिक बाईक च्या सेगमेंट मध्ये आणून आपलं नशीब आजमावणार आहे. या इलेक्ट्रिक बाईक मध्ये कमीत कमी 10000 वॅट ची पावरफूल मोटर उपलब्ध असेल असा अंदाज लावण्यात येत आहे. त्याचबरोबर या बजाज इलेक्ट्रिक बाइक ची बॅटरी साधारणतः 5 तासात फुल्ल चार्ज होईल आणि फास्टर चार्जर ने फक्त दोन तासात पूर्ण चार्ज होईल. एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर बजाजची ही इलेक्ट्रिक बाईक 150 किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल .
फीचर्स काय असतील?
बजाजच्या या नव्या इलेक्ट्रिक बाईक मध्ये डिजिटल स्पीडोमीटर डिजिटल, ऑडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, मोबाईल कनेक्टिव्हिटी, वायफाय, ब्लूटूथ, फास्ट चार्जिंग, रायटिंग मोड, कोम्बी ब्रेकिंग सिस्टम, नेव्हिगेशन, ABS यासोबत डिस्क ब्रेक यांसारखे फीचर्स मिळतील. ABS ही एक टेक्नॉलॉजी आहे. ज्यामुळे अपघाताचा धोका कमी होईल. हे ABS व्हील सेंसर पासून चालते. यामध्ये अचानक ब्रेक दाबल्यावर बाईकवर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त वेळ मिळतो. या टेक्नॉलॉजी मुळे सेन्सर अँटी लॉक ब्रेक ऑटोमॅटिकली सुरू होतात.
किमती किती असेल?
बजाज कंपनी ही इलेक्ट्रिक बाईक 2 व्हेरियंट बाजारात सादर केले जाणार आहे. त्या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 1.30 लाख रुपये असेल. त्याचबरोबर या बाईकचे टॉप मॉडेल 1.50 लाख रुपये असेल.