‘या’ झाडाचे लाकूड जगात कोणीच जाळत नाही; जर कोणी जाळायचा प्रयत्न केल्यास होतात ‘हे’ भयानक परिणाम

टाइम्स मराठी । संपूर्ण जगात बांबू (bamboo) हे एकमेव लाकूड आहे जे कोणीही पटकन जाळत नाही. हिंदूंनी हे लाकूड जाळणे नेहमीच अशुभ मानले आहे. म्हणूनच हिंदू बांबूचे लाकूड स्वयंपाकासाठी वापरत नाहीत किंवा पूजेतही वापरत नाहीत. एक प्रकारे बांबूचे लाकूड जाळण्यास हिंदू धर्मात सक्त मनाई आहे. मात्र, हा बांबू न जाळण्यामागे केवळ आध्यात्मिक भावना नसून त्यामागे काही वैज्ञानिक कारण (scientific reason) देखील आहेत (Agriculture News )

   

आधी अध्यात्मिक कारण समजून घ्या?

वास्तविक बांबू हे असे लाकूड आहे ज्याची बासरी भगवान श्रीकृष्ण नेहमी आपल्याजवळ ठेवतात. लग्नसमारंभ असतानाही मंडपात बांबूचा वापर केला जातो. मृत्यूनंतर माणसाचा मृतदेहही बांबूच्या लाकडावर ठेवून अंत्यसंस्कारासाठी नेला जातो. म्हणजेच बांबू माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्यासोबत राहतो. यामुळेच बांबूला आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते आणि ते जाळण्यास मनाई आहे. (Latest Marathi News )

आता जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

बांबू न जाळण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे त्यात शिसे आढळते. त्यात शिशासोबतच इतर अनेक प्रकारचे धातू आढळतात जे मानवी शरीरासाठी चांगले नाहीत. हेच कारण आहे की शास्त्रज्ञही हे लाकूड जाळण्यास नकार देतात. वास्तविक, जेव्हा तुम्ही बांबू जाळता तेव्हा त्यातील घटक धुराच्या माध्यमातून तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि मग ते अनेक आजारांना कारणीभूत ठरतात. यातील घटकामुळे न्यूरो आणि यकृताशी संबंधित आजार फार लवकर होतात. यामुळेच तज्ज्ञ बांबू जाळण्यास नेहमीच नकार देतात.