Bank Holidays In November 2023 : देशातील सर्वात मोठा सण असलेला महिना म्हणजेच नोव्हेंबर. कारण या महिन्यात सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी पैसे काढायला अनेकजण बँकेत जातात. आज-काल ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले जात असले तरी देखील काही व्यक्तींचा ऑनलाईन बँकिंग वर विश्वास नाही. यासोबतच काही मार्केटमध्ये अजून देखील ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध नाही. अशावेळी कॅश असणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही देखील बँकेत जाऊन पैसे काढण्याचा विचार करत असाल तर, नोव्हेंबर महिन्यात 15 दिवस बँक बंद राहणार आहे. या सुट्ट्या लक्षात घेऊन तुम्ही पेमेंट काढण्यासाठी बँकेत जाऊ शकता.
कधी आहेत बँका बंद – Bank Holidays In November 2023
भारतीय रिझर्व बँक हॉलिडे कॅलेंडर नुसार, 15 दिवस बँक बंद राहणार आहे. यामध्ये महिन्यातील सर्व रविवार दुसरा आणि चौथा शनिवार यांचा देखील समावेश आहे. या सोबतच दिवाळीनिमित्त जास्त राज्यांमध्ये बँकेला 11 ते 14 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी राहणार आहे. यासोबतच दिवाळीनिमित्त बरेच जण गावाला जाण्याचा प्लॅन देखील करू शकतात. जाणून घेऊया कोणत्या तारखेला बँकेला आहे सुट्टी. (Bank Holidays In November 2023)
1 नोव्हेंबरला कन्नड राज्योस्तव, कौरवाचौथ असल्यामुळे बँकेला सुट्टी आहे. ही सुट्टी मणिपूर आणि हिमाचल प्रदेश मध्ये देण्यात आली आहे.
10 नोव्हेंबरला वंगाला महोत्सव असल्यामुळे अगरतला, देहरादून, गंगटोक, इम्पाल, कानपुर, लखनऊ या ठिकाणी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.
11 ते 14 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीनिमित्त भारतातील जास्तीत जास्त राज्यांमध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे.
15 नोव्हेंबरला भाऊबीज, चित्रगुप्त जयंती, यामुळे गँगटोक, इंफाल, कानपूर, कोलकत्ता, लखनऊ आणि हिमाचल प्रदेशांमध्ये बँक बंद राहतील.
20 नोव्हेंबरला छटपर्व असल्यामुळे बिहार आणि छत्तीसगड मध्ये बँकांना हॉलिडे असेल.
23 नोव्हेंबरला उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये बँक बंद असेल.
25 आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार रविवार निमित्त लॉन्ग विकेंड असणार आहे. या दिवशी देखील बँक बंद असेल.
30 नोव्हेंबरला कनकदास जयंती निमित्त कर्नाटक मध्ये बँक बंद असतील.