Baseus CM10 इयर बड्स लॉन्च; सूर्यप्रकाशात सुद्धा होईल चार्ज

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपनीचे Ear Buds उपलब्ध आहेत. परंतु तुम्हाला असे Ear Buds माहिती आहेत का? जे चार्ज करण्याची गरज नाही. होय असे इयरबड्स मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. Baseus कंपनीने हे नवीन इयर बड्स लॉन्च केले आहे. या इयर बर्ड्स चे नाव Baseus CM10 आहे. हा एक सिंगल इयर  इयरफोन असून  यामध्ये बरेच इनोव्हेटिव्ह फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने हे इयर बड्स युनिक डिझाईन मध्ये लॉन्च केले आहे. या इयर बड्स च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर हे इयर बड्स परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या इयर बड्स चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

फिचर्स

Baseus CM10 हे सिंगल इयर इयरफोन आहे. म्हणजे फक्त एक इयर बड्स यामध्ये मिळते. जे युजर्स गाडी चालवताना देखील हॅन्ड फ्री कॉलिंग करू इच्छित आहे, त्यांच्यासाठी हे इयर बड्स बेस्ट ऑप्शन ठरेल. यासोबतच  ज्या युजर्सला कॉलिंग किंवा गाणे ऐकण्यावेळी अप्रतिम अनुभव हवा असतो त्यांच्यासाठी हे इयर बड्स ऑप्शन खास ठरेल. या इयर बड्स मध्ये  ड्युअल माईक देण्यात आला आहे. या सोबतच एन्व्हायरमेंटल नॉईस कॅन्सलेशन फीचर देखील यामध्ये मिळते. जेणेकरून युजर्सला गर्दीच्या ठिकाणी देखील क्लियर कॉल क्वालिटी मिळेल.

स्पेशालिटी

इयर बड्स चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला चार्जर ची गरज भासत नाही. ही या इयर बड्सची मोठी स्पेशालिटी आहे. या इयर बड्स मध्ये बेस सोबतच एक स्प्लिट डिझाईन देण्यात आली आहे. हे बेस म्हणजेच एक छोटे सोलर पॅनल आहे. जे मॅग्नेटिकली चार्जिंगशी जोडतो. आणि आपोआप सूर्यप्रकाशात चार्ज होऊ शकतो. याशिवाय तुम्ही पावर आउटलेटच्या माध्यमातून देखील इयर बड्स चार्ज करू शकतात. त्यासाठी Type C पोर्ट देखील देण्यात आले आहे.

बॅटरी

Baseus CM10 या इयर बड्स मध्ये 30 mAh बॅटरी देण्यात आली असून चार्जिंग केस मध्ये 400 mAh बॅटरी उपलब्ध आहे. चार्जिंग केस मध्ये 50 तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते. आणि इयर बड्स पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर 6 तासांपर्यंत चालू शकतो. हे इयर बड्स ब्लूटूथ 5.3 वर काम करते. यामध्ये 10 मीटर पर्यंत स्टेबल कनेक्शन मिळते. Baseus CM10 या इयर बड्स मध्ये व्हायब्रेशन डिटेक्शन फीचर देण्यात आले आहे. या फीचरच्या माध्यमातून व्हायब्रेशन फील करू शकतात. हे इयर बड्स आपोआप तुमच्या मोबाईलला कनेक्ट होऊ शकतात.

किंमत किती?

Baseus CM10 या इयर बड्स मध्ये कंपनीने दोन स्टायलिश कलर उपलब्ध केले आहे. त्यानुसार तुम्ही ब्लॅक आणि व्हाईट या कलर ऑप्शन मध्ये  हे इयर बड्स खरेदी करू शकतात. या इयर बड्स च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, 199 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 2300 रुपयांच्या किमतीत हे इयर बड्स उपलब्ध आहेत. तुम्ही हे इयर बड्स JD. Com या वेबसाईटवरून खरेदी करू शकता.