विराट कोहलीला BCCI चा इशारा; त्या Instagram पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात?

टाइम्स मराठी । भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा भारतासोबतच जगात देखील प्रसिद्ध आहे. विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू देखील मानला जातो. विराट कोहलीचे जगभरात प्रचंड फॅन्स आहे. यासोबतच विराट फक्त क्रिकेटमुळेच नाही तर काही वाद, अफवा यामुळे नेहमी चर्चेत राहतो. काही दिवसांपूर्वी कोहली instagram वर पोस्ट करून करोडो रुपये कमवत असल्याची अफवा पसरली होती. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी विराटने शेअर केलेला इंस्टाग्राम स्टोरी वरून तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने सुद्धा दखल घेतली असून विराटला ताकीद देखील देण्यात आली.

   

काय आहे प्रकरण?

गुरुवारी 24 ऑगस्टला विराट कोहलीने क्रिकेट मैदानात काढलेला सेल्फी पोस्ट केला होता. या सेल्फी मध्ये विराट शर्टलेस बसलेला दिसून आला. इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या या फोटोला देण्यात आलेल्या कॅप्शन मुळे विराट कोहली अडचणीत सापडला आहे. हे कॅप्शन अशाप्रकारे होतं,’ यो यो टेस्ट संपवण्याचा आनंद’ त्याचबरोबर यामध्ये 17.2 गुण मिळाले असल्यास देखील त्याने सांगितलं. आणि यासोबतच कॅप्शन मध्ये स्मायली इमोजी आणि हिरव्या रंगाची बरोबरची खूण म्हणजेच टिकमार्क वापरली होती.

navbharat times 103063171

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

क्रिकेटपटू विराट कोहलीने शेअर केलेला इंस्टाग्राम फोटोमध्ये दिलेल्या कॅप्शनवर बीसीसीआय चे वरिष्ठ अधिकारी नाराज झाले आहे. विराट कोहलीने गुप्त माहिती शेअर केल्यानंतर तासाभरातच बीसीसीआयच्या संघ व्यवस्थापनाने सर्व क्रिकेटपटूंना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खेळाडूंना यो यो त्याच्या आकडेवारी सारखी गुप्त माहिती जाहीर न करण्याची सूचना दिली.

गुप्त माहिती सार्वजनिक केल्यास होऊ शकते कारवाई

बीसीसीआय कडून गुप्त माहिती सार्वजनिक केल्यास कारवाई केली जाऊ शकते. विराट कोहलीने पोस्ट करून यो यो टेस्ट मधील गुण शेअर केल्यामुळे बीसीसीआयने याची तातडीने दखल घेतली. आणि सर्व खेळाडूंना असे गुप्त माहिती शेअर न करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की गुप्त माहिती शेअर करणे हे खेळाडू आणि बीसीसीआय दरम्यान झालेल्या कंत्राटाचं उल्लंघन आहे. यामुळे कारवाई देखील केली जाऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही सरावाचे फोटो शेअर करू शकतात परंतु आकडेवारी आणि गुप्त माहिती शेअर करणं हे चुकीचे आहे असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं.