तुम्ही देखील वापरत असाल हे 20 कॉमन पासवर्ड तर व्हा सतर्क

टाइम्स मराठी । बऱ्याचदा आपण डिजिटल प्लॅटफॉर्म वापरत असताना आपल्याला पासवर्ड क्रिएट करण्यास सांगितले जाते. जेणेकरून तुमचा डाटा सिक्युअर राहील. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने पासवर्ड क्रिएट करत असतो. या पासवर्डच्या माध्यमातून तुम्ही ओपन केलेले प्लॅटफॉर्म पासवर्ड शिवाय दुसरे कोणीच ओपन करू शकत नाही. परंतु भारतातील बरेच असे लोक आहेत जे सर्वसाधारण पासवर्ड डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ॲप वर लावतात. ज्यामुळे त्यांना पासवर्ड लक्षात राहील. परंतु यामुळे सर्वात जास्त धोका उद्भवू शकतो. कारण सर्वसाधारण पासवर्ड हे एका सेकंदापेक्षाही कमी वेळेमध्ये हॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला प्लॅटफॉर्म किंवा अँप वर स्ट्रॉंग पासवर्ड ठेवण्यास सांगितले जाते.

   

नॉर्डपास यांनी भारतीय नागरिक ठेवत असलेल्या पासवर्ड बद्दल सांगितलं की, भारतीय व्यक्तींचे सर्वात जास्त पासवर्ड हे काही सेकंदात हॅक केले जाऊ शकतात. नॉर्डपास यांनी असे 20 पासवर्ड सांगितले आहे.  जे हॅकर्स ला पूर्णपणे माहिती असतात. आणि भारतीयांनी कोणता पासवर्ड ठेवला असेल हे याचा अंदाजा देखील ते लावतात. त्यामुळे कधीही कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा एप्लीकेशन साठी स्ट्रॉंग पासवर्ड असणे गरजेचे आहे.

हे आहेत 20 कॉमन पासवर्ड

Pass@123, 123456789, Admin@123, India@123, admin@123, Pass@1234, 1234567890, Abcd@1234, Welcome@123, Abcd@123, admin123, administrator, Password@123, Password, UNKNOWN, 123456, admin, 12345678,12345, password

बऱ्याचदा युजर्स घाई गडबडीमध्ये आणि एक्साईटेड होऊन आपल्याला नंतरुन आठवेल असा पासवर्ड ठेवतात. हा पासवर्ड डिजिटल प्लॅटफॉर्मवर  किंवा एप्लीकेशन वर ठेवल्यास हॅक होण्याचे सर्वात जास्त चान्सेस असतात. सध्या मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम किंवा हॅकिंग चे प्रकार उघड होत आहेत. या हॅकिंग च्या प्रकारामध्ये सर्वात जास्त प्रकरण हे कमजोर पासवर्ड ठेवल्यामुळे उघड झाली आहेत. त्यामुळे पासवर्ड ठेवत असताना कधीही स्ट्रॉंग पद्धतीने आणि वेगळा ठेवणे गरजेचे आहे.