सावधान!! Whatsapp चॅटिंग करताना ‘ही’ चूक पडेल महागात; सरकारचा इशारा

टाइम्स मराठी । सध्या संपूर्ण देशाचे लक्ष्य १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाकडे आहे तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून माणिपूरमध्ये घडत असलेल्या हिंसाचारामुळे सरकारने राज्यांना अलर्ट जारी केले आहे. त्यातच जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हाट्सअँप (Whatsapp)वर देखील काही निर्बंध लावण्यात आले आहे. जर व्हाट्सअप च्या माध्यमातून कोणताही चुकीचा किंवा वादग्रस्त मेसेज फॉरवर्ड झाला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. याबद्दल सरकारने नागरिकांना इशारा दिला आहे.

   

मणिपूरमध्ये होणारा हिंसाचार हा वाढतच जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतात. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे वातावरण शांत न होता चुकीच्या मेसेज मुळे वातावरण पेटत आहे. हे प्रकरण शांत व्हावे यासाठी सरकारकडून बऱ्याच प्रकारची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे आता सरकारने खास करून व्हाट्सअप ग्रुप वरच्या चॅटिंग वर लक्ष केंद्रित केलेलं आहे. ज्याव्यक्ती ने ग्रुपवर धार्मिक भावना भडकवणारा संदेश किंवा व्हिडिओ शेअर केला असेल त्या व्यक्तीवर आणि ग्रुप ॲडमिन वर पोलीस कारवाई करणार आहे. त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्य दिनाला फक्त 13 दिवस बाकी असून या काळात कोणतेही वादग्रस्त मेसेजेस आल्यास कारवाई केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने खोटी माहिती किंवा अफ़वा पसरवण्याचा आणि प्रपोगोंडा साठी कोणताही मेसेज पाठवला तर त्या व्यक्तीला जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे. सध्या सोशल मीडिया अकाउंट वर गुप्तचर विभाग बारीक नजर ठेवून आहे. त्यामुळे या काळात कोणताही चुकीचा मेसेज एखाद्या ग्रुप वर आढळल्यास ग्रुप ॲडमिन सह ग्रुप मेंबर्स आणि मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते.