तुम्हीही Mozilla Firefox चा वापर करताय? सावध व्हा!! चोरी होऊ शकतो Data

टाइम्स मराठी । जर तुम्ही तुमच्या मोबाईल लॅपटॉप किंवा कम्प्युटर मध्ये Mozilla Firefox वापरत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण सरकारने याबाबत गंभीर इशारा जारी केला आहे. कारण या फायरफॉक्स ब्राउझरच्या ठराविक वर्जन मध्ये काही बग्स आढळले आहेत. हे बग्स तुमचे डिवाइस हॅक करू शकतात. डिवाइस हॅक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सरकारने याबाबत गंभीर इशारा दिला आहे.तसेच सतर्क राहायला सांगितलं आहे.

   

सरकारच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ने याबाबत माहिती देत खबरदारीचा इशारा दिला आहे. CERT IN च्या रिपोर्टनुसार, FIREFOX ESR VERSIONS BEFORE 115.5.0, MOZILLA THUNDERBIRD VERSION BEFORE 115.5 किंवा FIREFOX iOS VERSIONS BEFORE 120 VERSION चा वापर करणे खतरनाक असू शकते. कारण या वर्जनमध्ये  बग्स आढळले आहेत. जर तुम्ही देखील हे वर्जन वापरत असाल तर सावधान राहणे गरजेचे आहे.

डेटा चोरी होऊ शकतो-

या ब्राउझर व्हर्जनमध्ये  असलेल्या बग्समुळे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप मध्ये मालवेअर सॉफ्टवेअर सहजरीत्या प्रवेश करू शकते. त्यामुळे युजरचे पर्सनल डेटा, बँकिंग डिटेल्स  या प्रकारची बरीच माहिती चोरी होऊ शकते. आणि यामुळे तुमचे बँक अकाउंट रिकामे होण्याचे देखील मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत.

…. तर नाही होणार डेटा हॅक

डेटा हॅक होण्यापासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर फायरफॉक्स ब्राउझर वापरणे बंद न करता तुम्ही ब्राउझर अपडेट करू शकतात. जेणेकरून नवीन व्हर्जन मध्ये असलेल्या बग्स फिक्सेसमुळे डेटा चोरी होण्याचा धोका कमी होईल. यासोबतच तुम्ही फायरफॉक्स ब्राउझरला ऑटोमॅटिक अपडेट मध्ये सेट करू शकतात. जेणेकरून तुमचा ब्राउझर ऑटोमॅटिक अपडेट होईल.