Google Meet मध्ये कंपनी आणणार ब्युटी इफेक्ट फीचर; अशा पद्धतीने करेल काम

टाइम्स मराठी । Google सध्या वेगवेगळ्या Apps मध्ये नवीन नवीन फीचर्स उपलब्ध करत आहे. संपूर्ण जगभरामध्ये क्रोम यूजर हे गुगलच्या वेगवेगळ्या सर्विसचा फायदा घेत असतात. युजर्सचा एक्सपिरीयन्स वाढावा यासाठी गुगल नवीन अपडेट आणत असून आणखीन एका ॲप मध्ये गुगल नवीन अपडेट जारी करणार आहे. Google Meet हे ॲप मीटिंग घेण्यासाठी आणि ऑनलाइन क्लासेस साठी खास करून काम करते. हे एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म असून google आता Google Meet मध्ये नवीन फिल्टर फीचर्स उपलब्ध करणार आहे. त्यानुसार व्हिडिओ कॉलिंग वेळी वेगवेगळ्या फिल्टर्स युजर्स ला उपलब्ध होतील.

   

या तारखेला होणार रोल आउट

या नवीन फिल्टर फीचर च्या माध्यमातून व्हिडिओ कॉल वेळी यूजर्स ब्युटी इथे हे ऑप्शन यूज करू शकतात. आणि वेगवेगळ्या फिल्टर्स वापरू शकतात. त्यानुसार google वर्क स्पेस अपडेट ब्लॉगमध्ये कंपनीने याबाबत घोषणा करून सांगितले आहे की पोर्ट्रेट टच अप मोड हे फीचर सध्या फक्त काही यूजर साठी उपलब्ध करण्यात येणार आहे. आणि 28 ऑक्टोबरला हे फीचर सर्व युजर साठी रोल आउट करण्यात येईल. यासोबतच हे फीचर वेबवर देखील अपडेट करण्यात येऊ शकते.

अशा पद्धतीने काम करेल हे फीचर

गुगलच्या या पोर्ट्रेट टच अप मोड हे फीचर अपडेट केल्यानंतर गुगल मीटिंग वेळी ऍक्टिव्ह करता येऊ शकते. परंतु हे फीचर फक्त प्रीमियम गुगल अकाउंट यूजर साठी उपलब्ध असणार आहे. पर्सनल गुगल अकाउंट यूजर साठी हे फीचर उपलब्ध करण्यात येणार नाही. या फीचर्स सोबत गुगलकडून आणखीन दोन पोट्रेट मोड उपलब्ध करण्यात येणार आहे. या दोन्ही मोडच्या माध्यमातून इंस्टाग्राम प्रमाणेच ब्युटी फेसेस उपलब्ध करण्यात येतील.