6000 रुपयांपेक्षाही कमी पैशात मिळतोय Smart TV; पहा कुठे आहे ऑफर?

टाइम्स मराठी । मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या Smart TV उपलब्ध आहेत. तुम्ही देखील नवीन TV खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट कमी असेल तर टेन्शन घेऊ नका. सध्या फ्लिपकार्ट वर  BeethoSOL ब्रँड च्या टीव्हीवर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. या डिस्काउंट ऑफर नुसार  तुम्ही 6000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत फ्रेमलेस डिझाईन असलेला मोठा टीव्ही घरी घेऊन जाऊ शकता. मार्केटमध्ये या फ्रेमलेस डिझाईन असलेल्या मोठ्या टीव्ही ची किंमत 15000 रुपये आहे. परंतु तुम्ही Flipkart वर सुरू असलेल्या ऑफर च्या माध्यमातून या टीव्हीवर खास डिस्काउंट मिळवू शकतात.

   

फिचर्स

BeethoSOL ब्रँडच्या मोठा डिस्प्ले आणि प्रीमियम डिझाईन मध्ये उपलब्ध असलेल्या टीव्हीची स्पेशालिटी म्हणजे, या टीव्ही स्क्रीनला CPU किंवा लॅपटॉप सोबत कनेक्ट करता येऊ शकते. यासोबतच या टीव्हीला गेमिंग मॉनिटरच्या माध्यमातून देखील वापरता येऊ शकते. यामध्ये 24 इंच बेझल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. या टीव्हीवर इमर्सिव्ह व्हिज्युअल दिसतील. यासोबतच रॅपिड कास्ट फंक्शन देखील यामध्ये मिळेल. या फंक्शनच्या माध्यमातून स्मार्टफोन किंवा टॅबलेट यासारख्या डिव्हाइसेसच्या स्क्रीनमध्ये प्ले होऊ शकते.

ऑफर आणि किंमत

BeethoSOL ब्रँडच्या या टीव्ही मध्ये हाय क्वालिटी ऑडिओ साठी 26W बॉक्स स्पीकर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटी साठी HDMI ते USB कनेक्टिव्हिटी यासारखे ऑप्शन मिळतात. यातील 24 इंच स्क्रीन साईज असलेल्या या स्मार्ट टीव्ही ची किंमत 15,000 रुपये आहे. परंतु तुम्ही Flipkart वर डिस्काउंट ऑफरनुसार 5,799 रुपयामध्ये हा TV खरेदी करू शकता. याशिवाय फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड  च्या माध्यमातून पेमेंट केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल.