‘जवान’ च्या ट्रेलर रिलीजपूर्वी शाहरुखने घेतलं वैष्णो माताचे दर्शन

टाइम्स मराठी | बॉलीवूड किंग शाहरुख खानच्या (Shahrukh Khan)अपकमिंग जवान चित्रपटाचे 31 ऑगस्टला दुबई मध्ये ट्रेलर लॉन्च करण्यात येणार आहे. या ट्रेलर लॉन्चिंग पूर्वी शाहरुख खान चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे मंगळवारी शाहरुख खानने माता वैष्णो देवीचे दर्शन घेतले. शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी देखील त्यांनी वैष्णोदेवी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर ही फिल्म ब्लॉकबस्टर झाली. त्यानुसार आता जवान मूवी देखील लवकरच रिलीज होणार आहे. परंतु या मूवी चा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खान ने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे.

   

सोशल मीडियावर सध्या शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान अत्यंत काटेकोर बंदोबस्तांमध्ये दिसला. यावेळी शाहरुख खानने पांढऱ्या रंगातील शर्ट आणि निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते. यासोबतच शाहरुख खानचा संपूर्ण चेहरा मास्कने झाकलेला होता. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता तो कटरा या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर एका ठिकाणी विश्रांती करून तो रात्री अकराच्या सुमारास भवनकडे रवाना झाला.

शाहरुख खानचा अपकमिंग चित्रपट जवान चे दिग्दर्शन एटली यांनी केले आहे. जवान चित्रपट सात सप्टेंबरला रिलीज होणार असून हा हिंदी, तमिळ, तेलुगु भाषांमध्ये देखील रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान सोबत नयनतारा आणि विजय सेतु पती देखील दिसणार आहेत. यासोबतच खास भूमिकेत दीपिका पदुकोण देखील असेल. जवान चित्रपटाच्या स्टार कास्ट मध्ये रिद्धी डोंगरा आणि सान्या मल्होत्रा देखील सहभागी आहे.

शाहरुख खानची ही या वर्षातील दुसरी फिल्म असेल. यापूर्वी पठाण हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. पठाण या चित्रपटाने 544 करोड रुपये कमावले होते. या सोबतच बॉलीवूड आणि सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून पठाणला एक नवीन ओळख मिळाली होती. आता शाहरुख खानचा येणारा अपकमिंग जवान हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर होतो की फेल जातो हे पाहणे आकर्षक ठरेल.