Benelli ने सादर केली Tornado Naked 500 Twins बाईक

टाइम्स मराठी । इटली येथील मिलान मध्ये सुरू असलेल्या ECMA ऑटो शोमध्ये  Benelli कंपनीची Tornado Naked 500 Twins बाईक सादर करण्यात आली. Benelli ही एक इटालियन कंपनी आहे.  ही कंपनी बाईक आणि स्कूटर डेव्हलप करते. Benelli कंपनीची ही नवीन बाईक  2024 मध्ये लॉन्च होणार आहे. कंपनीने या बाईकमध्ये बरेच फीचर्स उपलब्ध केले असून या बाईकचा लूक स्टायलिश दिसत आहे. जाणून घेऊया या बाईकचे अप्रतिम फीचर्स आणि मायलेज.

   

पावरट्रेन

Tornado Naked 500 Twins या बाईकमध्ये कंपनीने 500cc पावरफुल इंजिन दिले आहे. हे लिक्विड कुल्ड इंजिन असेल. या इंजिनच्या माध्यमातून यामध्ये पावर जनरेट होईल. हे इंजिन 47.6 BHP पावर आणि 46 NM पीक टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सह उपलब्ध करण्यात येणार आहे. ही हाय स्पीड बाईक काही सेकंदांमध्येच वेग पकडण्यास सक्षम असेल. या अपकमिंग बाईक मध्ये ड्युअल कलर ऑप्शन मिळणार आहे.

फीचर्स

Tornado Naked 500 Twins या स्टायलिश बाइक मध्ये डिझायनर हेडलाईट या सह स्टायलिश एक्झॉस्ट मिळेल. यासोबतच  प्रोजेक्टर LEDS लाईटसह बुमरँग शेप  DRLS देखील मिळेल. या बाईकमध्ये लॉंग रूट साठी मोठा फ्युएल टॅंक देण्यात येणार आहे. या बाईक मध्ये कंपनीने 17 इंच व्हील  दिले असून यामध्ये सेफ्टी साठी फ्रंट आणि रियर टायर मध्ये डिस्क ब्रेक चा वापर करण्यात येईल. यासोबतच  बाईक मध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि टीएफटी कन्सोल मिळेल.