भारतातील सर्वात महागडी Car कोणती माहितेय का? फीचर्स आणि किंमत पाहून तुमचाही होश उडेल

टाईम्स मराठी । भारतात एकामागून एक गाड्या लाँच होतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्री साठी भारतीय बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशात ऑडी, BMW आणि मर्सिडीज अशा दिग्गज कंपन्यांच्या गाड्या बाजारात सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असतात. परंतु भारतातील सर्वात महागडी गाडी कोणती? हे तुम्हाला माहित आहे का? चला आज आम्ही तुम्हाला सांगतो, ब्रिटीश कार निर्माता कंपनी बेंटले कंपनीची Bentley Mulsanne EWB सेंटेनरी एडिशन ही देशातील सर्वात महागडी गाडी आहे.

   

Bentle लक्झरी कार ही उच्च स्तराची अत्यंत सुंदर आणि अत्याधुनिक पद्धतीने विकसित केलेली कार आहे. या कारमध्ये गोल्डन विन्टेज, मुलसूची, कॉन्टिनेन्टल, बेंटायगा, बेंटले मुल्साने, बेंटले फ्लाईंग स्पर अशा प्रकारचे वेगवेगळी मॉडेल्स लॉन्च केलेली आहेत. ही कार उत्तम रायडींग चा अनुभव देते. ही सुंदर पद्धतीने डिझाईन केलेली कार असून या कारचे बॉडी स्ट्रक्चर, डोर डिझाईन, हेडलाईट, रूफलाईन, लॉन्ग व्हील बेस, हे सर्व पार्ट कारकडे आकर्षित करतात.

इंजिन आणि वेग –

काही दिवसांपूर्वी ही कार बेंगळुरू मध्ये दिसली. या कारची किंमत 14 कोटी रुपये आहे. कार क्रेझी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या कारचे फोटो पोस्ट करण्यात आले आहे. या लक्झरी कारमध्ये 6.75 लिटर पेट्रोल V8 इंजिन बसवण्यात आले आहे. 8 स्पीड ऑटोमैटिक ट्रांसमिशन वाले हे इंजिन 506 हॉर्स पॉवर आणि 1020 एनएम टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे. तसेच अवघ्या 5.5 सेकंदाच्या आत ही कार 0 ते 100 किलोमीटर पर्यंत वेग पकडू शकते. या आलिशान कारचे टॉप स्पीड 296 kmph एवढं आहे.