Best Off Road Bikes । तरुणांना बाईकचे मोठ्या प्रमाणात आकर्षण असते. त्याचबरोबर खास करून ऑफ रोडींग बाइक्सला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. ऑफ रोडींग बाईक्स चा वापर करून आपण पहाडी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात राइड करू शकतो. चालवायला अतिशय दणकट, कोणत्याही रस्त्यावर कशीही फिरवता येईल अशी मजबूत असलेली ऑफ राईड बाईक तरुणांच्या मनावर राज्य करत आली आहे. आजच आम्ही तुम्हाला अशाच काही ऑफ रोडींग गाड्यांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हीही खरेदी करू शकता.
१) Hero Xpulse 200–
हिरो मोटोकॉर्प या कंपनीचे मॉडेल असलेली Hero Xpulse 200 ही बाईक 1.44 लाख रुपयांच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे. या बाईक मध्ये OBD 2 आणि E20 कंप्लेंट इंजिन देण्यात आलेले असून ही बाईक 20% इथेनॉल ब्लेंडिंग फ्युल वर चालते. त्याचबरोबर या बाईकमध्ये 200cc फोर वोल्व ऑइल कुल्ड बीएस VI इंजिन देण्यात आलेले आहे. ते 8000 rpm वर 19hp पावर आणि 6500 rpm वर 17.35 Nm पिक टॉर्क जनरेट करते.
२) KTM390 Adventure-
केटीएम हि दुचाकी निर्माता कंपनी जगभरात स्पोर्ट्स बाईक ची विक्री करते. KTM390 Adventure ही बाईक 3.28 लाख रुपये एवढ्या किमतीत उपलब्ध आहे. या स्पोर्ट बाईक मध्ये नवीन कलर शेड देण्यात आलेले असून यामध्ये रेसिंग ब्ल्यू आणि डार्क गॅलव्हानो ब्लॅक या रंगाचा समावेश आहे. या बाईकमध्ये आलोय व्हील्स देण्यात आलेल्या असून या बाईकमध्ये देण्यात आलेले इंजिन असिस्ट आणि स्लीपर क्लचसह ट्रॅक्शन कंट्रोल ने सुसज्ज आहे. बाईक मध्ये पॉवर साठी 373.2 cc सिंगल सिलेंडर, लिक्विड कुल्ड, फ्युल इंजेक्टेड देण्यात आलेले आहे. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सला जोडलेले असून 43 hp पावर आणि 37nm टॉर्क जनरेट करते.
३) Moto Morini X cape 650–
ऑफ रोडींग बाइक्स पैकी (Best Off Road Bikes) ही एक फेमस बाईक आहे. या बाईकमध्ये स्मोक्ड विंडस्क्रीन, फेयरिंग, एलईडी हेडलाईट, त्याच्याखाली फॉग लॅम्प आणि टेल लॅम्प देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या बाईक मध्ये सिक्युरिटी साठी फ्रंट डिस्क ब्रेक, सिल्वर कलर चा क्रॅश गार्ड, रिमोट ऍडजेस्टेबल रियर शॉक, फ्रंट यूएसडी फोक्स , आणि ब्रेकिंग हार्डवेअर देण्यात आलेले आहे. या बाईक मध्ये 649 cc इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सला जोडलेलं असून हे इंजिन 60hp पॉवर जनरेट करते आणि 54 nm टिक टॉक देखील जनरेट करते. Moto Morini X cape 650 बाईकची किंमत 7.30 लाख रुपये आहे.
४) V-Strom SX- Best Off Road Bikes
सुझुकी मोटरसायकल इंडिया ची V-Strom SX हे एडवेंचर टूरर बाईक आहे. या बाईक मध्ये 249 cc ऑइल कुल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये राईड कनेक्ट आणि यूएसबी आउटलेट देण्यात आलेले असून इझी स्टार्ट सिस्टम देखील यामध्ये देण्यात आली आहे. V-Strom SX या बाईकसोबत रायडर ला टर्न बाय टर्न नेवीगेशन, इनकमिंग कॉल, एसएमएस अलर्ट, व्हाट्सअप अलर्ट डिस्प्ले, मिस्ड कॉल, स्पीड वॉर्निंग, बॅटरी लेवल डिस्प्ले आणि चार्ज करण्यासाठी सक्षम इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आले आहे. या बाईकची किंमत 2.11 लाख रुपये एवढी आहे.
५) Royal Enfield Himalayan 411-
ही बाईक रॉयल एनफिल्ड हिमालयन ची कॉम्पेक्ट वर्जन आहे. या बाईक मध्ये 411 cc सिंगल सिलेंडर, एयर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 6500 RPM वर 32 NM पीक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर यामध्ये 5 स्पीड गियरबॉक्स देण्यात आले आहे. या बाईकच्या फ्रंट मध्ये 2-पिस्टन फ्लोटिंग कैलीपर, 300 मिलिमिटर डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रियर मध्ये सिंगल पिस्टन फ्लोटिंग कैलिपर, 240 मिलिमीटर डिस्क ब्रेक देण्यात आलेला असून यामध्ये ड्युअल ABS सिस्टीम देखील उपलब्ध आहे. या बाईकची किंमत 2.16 लाख रुपये एवढी आहे.