Best Offer : ‘या’ जबरदस्त मोबाईलवर बेस्ट ऑफर सुरु! फक्त 15 हजारात 16 GB रॅम अन 256 GB स्टोरेज

टाईम्स मराठी टीम । स्मार्ट फोन वापरणाऱ्या बऱ्याच जणांना मोबाईल स्टोरेज फुल्ल झाल्यामुळे प्रॉब्लेम येत असतात. अचानक स्मार्ट फोन हँग पडतो, स्लो चालतो अशा कारणांनी आपण त्रस्त असतो. पण आता बाजारात असा मोबाईल फोन आला आहे, ज्यामुळे आपल्याला मोबाईल स्लो झाला, स्टोरेज फुल्ल झाले यासारखे प्रॉब्लेम येणार नाही. बाजारात 15 हजारात 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेला 5G मोबाईल विकल्या जात आहे. एवढ्या कमी रुपयात एवढी मोठी ऑफर देणारा हा मोबाईल आहे तरी कोणता? हा आहे टेक्नो स्पार्क 10 मोबाईल.

   

या टेक्नो मोबाईल मध्ये 8gb इन्स्टोल रॅम सोबतच 8GB वर्च्युअल रॅम देखील आहे. म्हणजे एकूण 16 GB रॅम आपण या मोबाईल मध्ये वापरू शकतो. एवढंच नाही तर 5000mAh क्षमता असलेली बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला 15 हजारात ऑनलाईन ऍमेझॉन वरून विकत घेता येऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर एक्सचेंज ऑफर ने देखील हा स्मार्टफोन घेता येऊ शकतो. तेही 10 हजार किंवा त्यापेक्षा कमी रुपयात.

या टेक्नो स्पार्क 10 स्मार्टफोन ची किंमत 16 हजार 999 आहे. पण ऑनलाईन शॉपिंग अँप ऍमेझॉन वर 12 टक्के डिस्काउंट देऊन हा मोबाईल 14 हजार 999 या किमतीमध्ये विकण्यात येत आहे. त्याचबरोबर जर तुम्ही हा स्मार्टफोन HDFC Bank क्रेडिट आणि डेबिट कार्ड वरून पैसे देऊन 5 टक्के किंवा EMI वर खरेदी करणार असाल तर 1 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर नुसार तुम्हाला 14 हजार 249 रुपयांपर्यत डिस्काउंट मिळू शकतो.