Bestune Xiaoma Mini EV : स्वस्तात मस्त Electric Car लाँच; सिंगल चार्जवर 1200 KM धावेल

Bestune Xiaoma Mini EV । चीनच्या फर्स्ट ऑटो वर्क्स FAW ने ब्रेस्ट्यून ब्रँडच्या माध्यमातून Bestune Xiaoma Mini EV हि इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. सध्या ही चीनमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी मायक्रो कार असून या महिन्यापासून इलेक्ट्रिक कारची प्री सेल सुरू होणार आहे. या मिनी कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल 1200 किलोमीटर पर्यंत अंतर पार करू शकते. तसेच या गाडीची किंमतही इतर गाड्यांच्या तुलनेत परवडणारी आहे. आज आपण Bestune Xiaoma Mini EV या इलेक्ट्रिक कारचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

फिचर्स

Bestune Xiaoma Mini EV चे सध्या हार्डटॉप व्हेरिएंट उपलब्ध आहे. या मिनी कार मध्ये 7 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डॅशबोर्डवर आकर्षक ड्युअल टोन थीम देण्यात आली आहे. यासोबतच कारच्या पाठीमागील बाजूने मॅचिंग टेललॅम्प, बंपरसह अप्रतिम डिझाईन थीम देण्यात आली आहे. एवढेच नाही तर या कारमध्ये ड्युअल टोन कलर उपलब्ध करण्यात आला असून ही बॉक्सी प्रोफाइल देते. या मिनी कारची लांबी 3000mm, रुंदी 1510 mm, उंची 1630 mm आणि व्हीलबेस 1953 mm इतका आहे.

1200 KM रेंज- Bestune Xiaoma Mini EV

Bestune Xiaoma Mini EV मध्ये 20 kwh इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. यासोबतच रोशन आणि REPT प्राप्त लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी देखील यामध्ये देण्यात आली आहे. या मिनी इलेक्ट्रिक कारच्या रेंज बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये A1 आणि A2 हे दोन व्हेरियंट उपलब्ध आहे. हे दोन्ही व्हेरिएंट वेगवेगळ्या व्हीलबेसने सुसज्ज आहे. यातील A1 व्हेरियंट 800 km पेक्षा जास्त रेंज देते तर A2 व्हेरियंट मॉडेल 1200 किलोमीटर एवढी रेंज देते. Bestune Xiaoma Mini EV मध्ये ड्रायव्हर साईड एअर बॅग देण्यात आले आहेत. यामध्ये तीन डोअर कॉन्फिगरेशन उपलब्ध आहे.

किंमत किती?

Bestune Xiaoma Mini EV ही कार प्रसिद्ध वुलिंग होंगगुआंग मिनी इलेक्ट्रिक कार सोबत प्रतिस्पर्धा करते. ही कार याच वर्षी शांघाय ऑटो शोमध्ये एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आली होती. या इव्हेंट दरम्यान हार्डटॉप आणि कन्वर्टिबल हे दोन्ही प्रकार सादर करण्यात आले होते. या इलेक्ट्रिक मिनी कारची किंमत 30000 ते 50,000 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 3.47 लाख ते 5.78 लाख रुपये एवढी आहे.