85 KM रेंजसह लाँच झाली आकर्षक Electric Scooter; किंमत किती?

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे प्रचंड कल दिसून येत आहे. वाढती मागणी पाहता बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यामध्ये आपलं लक आजमावत आहे. अशातच आता इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी BGAUSS ने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच नाव BGAUSS C12i EX असं आहे. कंपनीची ही C 12 सिरीज मधील स्कूटर असून यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या BGAUSS C12i Max ला तीन महिन्यांमध्ये 6000 ग्राहक मिळाले होते. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरची खास फीचर्स आणि रेंज याबाबत जाणून घेऊया.

   

फीचर्स

BGAUSS C12i Ex ही इलेक्ट्रिक स्कूटर अर्बन मोबिलिटीला लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहे. या स्कूटर मध्ये 23 लिटर अंडर सीट स्टोरेज स्पेस देण्यात आला आहे. जेणेकरून यात दोन फुल साईज हेल्मेट बसू शकतील. यासोबतच 774mm एक्स्ट्रा कम्फर्टेबल सीट देखील देण्यात आले आहे. या स्कूटरच्या फ्रंट मध्ये स्टोरेज स्पेस देखील उपलब्ध आहे. यासोबतच रायडींग करताना देखील या स्कूटरमुळे आरामदायी अनुभव येतो.

85 किलोमीटर पर्यंत रेंज

BGAUSS C12i Ex या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 2.0 kwh क्षमता असलेली लिथियम बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी IP67 रेटेड असून फुल चार्ज होण्यासाठी चार तास ३० मिनिटांचा वेळ घेते. परंतु एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 85 किलोमीटर पर्यंत आरामात प्रवास करू शकते.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

BGAUSS C12i Ex या स्कूटर मध्ये देण्यात आलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, चार्जिंग कनेक्टर, एलईडी हेडलाईट, 155 एमएम ग्राउंड क्लिअरन्स, फ्रेंड मध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन, मागच्या साईडने शॉक ऑब्झरवर सस्पेन्शन यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

स्कूटरमध्ये गुणवत्ता सुरक्षितता प्रदान करण्यात आली आहे

BGAUSS कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्कूटर मध्ये उत्पादन गुणवत्ता , सुरक्षितता प्रदान केली आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या स्कूटर 100% मेड इन इंडिया असून चांगल्या दर्जाच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणे हे आमच्या कंपनीचे उद्दिष्टे आहे असं BGAUSS C12i Ex चे संस्थापक आणि सीईओ हेमंत काबरा यांनी सांगितलं. त्याचबरोबर BGAUSS C12i max या इलेक्ट्रिक स्कूटर ला ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादासाठी आम्ही आभारी आहोत. BGAUSS C12i Ex ला देखील तुमच्याकडून असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. असं देखील त्यांनी सांगितलं.

किंमत किती?

BGAUSS C12i Ex या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 99,999 रुपये एवढी असून ही ऑफर फक्त १९ सप्टेंबर पर्यंतच लागू करण्यात आली आहे. या स्कूटर मध्ये देण्यात आलेली बॅटरी 70 हजार किलोमीटर पर्यंत टिकू शकते. बाकीच्या इलेक्ट्रिक स्कूटर वर्षभरात दहा हजार किलोमीटर पर्यंत ड्राईव्ह करतात. परंतु BGAUSS C12i Ex स्कूटर खरेदी केल्यानंतर सहा ते सात वर्षापर्यंत बॅटरीची चिंता करण्याची गरज भासणार नाही.