BH Number Plate : BH नंबरप्लेट म्हणजे काय रं भाऊ? कोणासाठी असते ती अन् अर्ज कसा करायचा?

टाइम्स मराठी । मित्रानो, सर्व गाड्यांच्या नंबर प्लेटवर तुम्ही सुरुवातीला MH असं लिहिलेलं बघितलं असेल, तुमच्याही गाडीच्या नंबर प्लेट वर MH असच लिहिले असेल ज्याचा अर्थ महाराष्ट्र असा होतो. तसेच रस्त्यावर जाताना तुम्ही KA, GA, TN अशा सिरीजचे दुसऱ्या राज्यांच्या गाड्यांचे नंबर प्लेट सुद्धा बघितलं असतील. पण तुम्ही कधी BH नंबर सिरीज (BH Number Plate) असलेली गाडी बघितली आहे? बघितली असेल तर BH सिरीजचा लॉन्ग फॉर्म काय? आणि ती कोणासाठी असते असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात निर्माण झाला असेल. चला तर आज आपण नंबर प्लेटवरील BH सिरीज बाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

   

BH नेमप्लेट ही एक भारतामध्ये वापरण्यात येणारी वेहीकल रजिस्ट्रेशन प्लेट आहे. या नेमप्लेट मधील BH हे भारत किंवा इंडिया दर्शवते. या नंबर प्लेट एक खास फॉरमॅटचे पालन करतात. या नेमप्लेट फोर व्हीलर आणि टू व्हीलर या वाहनांची कायदेशीर ओळख पटवण्यासाठी गरजेचे असतात. यानुसार जाणून घेऊया BH नेमप्लेट नेमकं आहे तरी काय.

काय आहे BH नंबर प्लेट? (BH Number Plate)

BH नंबर प्लेट हे भारतातील वाहनांच्या रजिस्ट्रेशन प्लेटच्या एक स्टॅंडर्ड सिस्टीमचा भाग आहे. ज्यामुळे वाहनांची ओळख होऊन युनिफॉर्मिटी आणि क्लियरिटी समजते. ही नंबरप्लेट खास डिझाईन आणि फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. जेणेकरून भारतीय रजिस्ट्रेशन प्लेट्स सहजतेने ओळखले जातात. BH नंबर प्लेट मध्ये अक्षर आणि संख्या वेगळ्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध असतात. म्हणजेच दोन अक्षरानंतर दोन अंक आणि पुन्हा दोन अक्षर असा फॉरमॅट असतो. समजा MH01 AB 1234. BH नंबर प्लेटमध्ये पहिले दोन अक्षर हे वाहन नोंदणीकृत असलेल्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाची माहिती देतात. आणि या नेमप्लेट वर असलेले अंक हे या वाहनासाठी चा अंक दाखवत असतात.

कोणाला मिळते ही BH सिरीज?

जे लोक संरक्षण क्षेत्रात म्हणजेत सैन्य किंवा नीमलष्करात काम करतात त्यांना BH नंबर सिरीज मिळू शकते .

जे नागरिक राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत त्यांनाही BH सिरीज मिळते.

याशिवाय ज्या खासगी कंपन्यांचे प्लांट देशातील कमीत कमी ४ राज्यांत किंवा केंद्रशासित प्रदेशात आहेत त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना BH सिरीज मिळू शकते.

BH नंबर प्लेट घेण्यासाठी काय करावे ?

BH नंबर प्लेटसाठी (BH Number Plate) ऑनलाइन पद्धतीने एप्लीकेशन करण्यासाठी सर्वात आधी यासाठी करण्यात आलेलं नियम चेक करणे गरजेचे आहे. यामध्ये वाहन अप्लाय करण्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे अगोदर बघितलं जाते. जर तुम्ही पात्र असाल तर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. आणि त्यानंतर अपलोड केलेले डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी तयार करावा लागेल. आणि या सोबतच फॉर्म देखील भरून द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला फीज सबमिट करून आरटीओ अप्रू घ्यावा लागेल.

ऑफलाइन एप्लीकेशन करण्यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर साठी तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावे लागेल. हे सर्टिफिकेट घेतल्यानंतर तुम्ही BH सिरीज साठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह तुम्हाला भारत मार्क सिरीज साठी एप्लीकेशन द्यावे लागेल.