जगाच्या नकाशावरुन जपान गायब होणार? नेमकं कोणतं संकट घोंगावतंय?

टाइम्स मराठी । उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये एक वेगळं संकट उभारलं आहे. हे संकट म्हणजे घटत चाललेला जन्मदर. जपानमध्ये मागील काही दशकांपासून बाळांच्या जन्मदरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्ये जपानची लोकसंख्या पूर्णपणे संपुष्टात येते की काय ही भीती प्रधानमंत्री फोमियो किशीदा यांनी व्यक्त केली आहे. असं झाल्यास संपूर्ण जगाच्या नकाशावरून जपान गायब होऊ शकत.

   

जपानच्या स्वास्थ्य श्रम आणि कल्याण मंत्रालयानुसार, ज्या कुटुंबामध्ये 18 वर्षापेक्षा कमी वयाचे मुलं आहे, त्या कुटुंबाची संख्या 9.917 मिलियन वर पोहोचली आहे. ही आकडेवारी 2019 च्या आकडेवारी पेक्षा 3.4 टक्के कमी यामध्ये 18.3% घट झाली आहे. यापैकी 49.3% कुटुंबामध्ये फक्त एक मुल आहे. तर 38% कुटुंबामध्ये दोन मुलं असून 12.7 टक्के कुटुंबामध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं आहे. त्याचबरोबर 2022 मध्ये मुल असलेल्या कुटुंबाची संख्या 1 करोड पेक्षा कमी झालेली आहे.

एका अहवालामध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या जन्माच्या तुलनेत दुप्पट लोक मरण पावत आहे. मागच्या वर्षी 8 लाख मुलांचा जन्म झाला असून 15 लाख 80 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 28 फेब्रुवारीला जपानने घोषणा केली होती त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की, गेल्या वर्षी देशात जन्मलेल्या मुलांची संख्या विक्रमी पातळीवर घटली आहे. हा आकडा जपानच्या दृष्टीने खूप मोठा आणि गंभीर आहे. त्यामुळे फोमियो किशीदा यांना जपानचे जनजीवन नष्ट होण्याची भीती सतावत आहे.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशीदा यांनी जन्मदर आणि लोकसंख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या असून या योजनांमध्ये आर्थिक मदत देखील देण्याचा दावा केलेला आहे. तरीही जपानी कुटुंबीयांवर याचा काहीच परिणाम झाल्याचा दिसत नाही. जपानची लोकसंख्या 2008 मध्ये 128 दशलक्ष होती. ती 2022 मध्ये 124.6 दशलक्ष एवढी झाली आहे. बारा वर्षांमध्ये जपानची लोकसंख्या वाढण्याऐवजी घटत चालली आहे. जपानसमोर असलेलं हे सर्वात मोठं संकट मानलं जातंय.