Bike Stunt आला अंगलटी; तरुण- तरुणी रस्त्यावरच झाले आडवे (Video)

टाईम्स मराठी । आपल्या देशात वेगवगळे स्टंट करणाऱ्या बहाद्दरांची कमी नाही. याबाबत सोशल मीडियावर तर सतत वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये बाईकवर स्टंट करणं एका कपलच्या चांगलंच अंगलटी आलेलं दिसत आहे. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांनीचा हा विडिओ शेअर करत अशाप्रकारचे जीवघेणे स्टंट करू नका असं आवाहन केलं आहे.

   

व्हायरल व्हिडिओ मध्ये नेमकं काय आहे?

दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता कि एक कपल चालू बाईक वर स्टंट करत आहे. हा व्हिडिओ 27 सेकंदाचाअसून त्यामध्ये गाडी चालवत असलेला अत्यंत भरधाव वेगात गाडी पळवत आहे. येव्हडच नव्हे तर त्यानंतर त्याने स्टंट मारून एका चाकावर बाईक चालवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा हा प्रयत्न केल्यावर त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. पण त्यानंतर दुसऱ्या वेळेस हा प्रयत्न फसला. गाडीचा बॅलन्स बिघडल्यामुळे तो तरुण आणि पाठीमागे बसलेली मुलगी दोघेही बाईक वरून पडले आणि त्यांची चांगलीच फजिती झाली .

विशेष म्हणजे अशाप्रकारचे जीवघेणे स्टंट करत असताना त्यांनी हॅम्लेट सुद्धा घातलेलं नाही. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ ट्विट करत सुरक्षितपणे गाडी चालवा, बेपर्वाही करू नका असं आवाहन केलं आहे. अगदी काही वेळेतच हा विडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय.