टाइम्स मराठी । आज तुम्हाला सोशल मीडियावर , वेबसाईटवर, किंवा एड्स मध्ये ब्लॅक फ्रायडे सेल Black Friday Sale दिसत असेल. तुम्ही देखील या सेल च्या माध्यमातून शॉपिंग करण्याचा विचार करत असाल. परंतु तुम्हाला माहिती आहे का ब्लॅक फ्रायडे का आणि कशासाठी सेलिब्रेट केला जातो. या ब्लॅक फ्रायडे च्या मागे एक इतिहास लपलेला आहे. या इतिहासामुळे ब्लॅक फ्रायडे सेल साजरा केला जातो. हा ब्लॅक फ्रायडे सेल 24 नोव्हेंबरला मनवण्यात येतो. हा सेल आज पासून म्हणजेच 24 नोव्हेंबर पासून संपूर्ण जगभरात सुरू करण्यात येत आहे. अनेक जण वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात. दिवाळी प्रमाणेच या सेलमध्ये बऱ्याच ऑफर सह प्रोडक्ट विक्री केली जाते. गेल्या काही वर्षापासून भारतात देखील हा दिवस साजरा केला जात आहे. जाणून घेऊया काय आहे ब्लॅक फ्रायडे मागील इतिहास.
पश्चिमात्य संस्कृतीतून आला हा दिवस- Black Friday Sale
Black Friday हा दिवस पश्चिमात्य संस्कृतीतून आलेला आहे. खास करून युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिकेला या दिवसाचे श्रेय जाते. आपल्या सर्वांना माहित आहे डिसेंबर महिन्यात नाताळ हा सण सुरू होतो. त्यानुसार थँक्स गिव्हिंग THANKS GIVHING जेवणानंतर येणाऱ्या शुक्रवारला ब्लॅक फ्रायडे म्हटले जाते. या ब्लॅक फ्रायडे च्या दिवशी सर्वात जास्त खरेदी करण्यात येते. आणि या दिवशी करण्यात येणाऱ्या खरेदी व ग्राहकांना सर्वात जास्त सवलत देखील दिली जाते. त्यामुळे या दिवसाला हॉलिडे शॉपिंग सीजन म्हणून देखील ओळखले जाते.
थँक्स गिविंग नंतरचा दिवस म्हणजे Black Friday
ब्लॅक फ्रायडे हे नाव दोन शब्दांचे मिळून बनवण्यात आले आहे. यामध्ये ब्लॅक म्हणजे काळा आणि फ्रायडे म्हणजे शुक्रवार. थँक्स गिव्हिंग नंतरचा दिवस म्हणजेच ब्लॅक फ्रायडे. अमेरिकेमध्ये हा दिवस अतिशय लोकप्रिय आहे. थँक्स गिविंग हा नेहमी नोव्हेंबर मधील चौथ्या गुरुवारी येतो. आणि त्यानंतर येणारा शुक्रवार हा ब्लॅक फ्रायडे (Black Friday Sale) म्हणून साजरा केला जातो. ब्लॅक फ्रायडे हे नाव सर्वात अगोदर 24 सप्टेंबर 1869 ला वापरण्यात आले होते.
फिलाडेल्फिया पोलिसांकडून पहिल्यांदा या शब्दाचा उच्चार
ब्लॅक फ्रायडे हा शब्द फिलाडेल्फिया पोलिसांकडून पहिल्यांदा वापरण्यात आल्याचा दावा केला जातो. त्यांनी हा शब्द थँक्स गिव्हिंगच्या दिवसाचे वर्णन करण्यासाठी केला होता. कारण त्यांना थँक्स गिव्हिंग नंतर वाढलेल्या गर्दीमुळे 12 तास शिफ्ट मध्ये काम करावे लागले होते. कारण या दिवशी ग्राहक खरेदीसाठी शहरात येत होते. आणि त्याचवेळी शहरांमध्ये लोकप्रिय खेळ वार्षिक आर्मी नेव्ही फुटबॉल सामना सुरू होता. त्यामुळे वैतागलेल्या पोलिसांनी शुक्रवारची तुलना काळ्या दिवसांसोबत केली होती. तेव्हापासून फिलाडेल्फिया मधील खरेदीदार आणि व्यापारांमध्ये हा शब्द अत्यंत प्रचलित आहे.