टाइम्स मराठी । सध्याचा काळ हा मोबाईलचा काळ असून प्रत्येकालाच मोबाईल शिवाय जमतच नाही. मोबाईलचे हे वाढते वेड पाहता अनेक कंपन्या अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल बाजारात आणत असते. त्याच पार्श्वभूमीवर युरोपीयन ZTE या कंपनीने ZTE Blade V50 Design 5G स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कमी किमतीमध्ये उपलब्ध असून वेगवेगळ्या फीचर्सने परिपूर्ण आहे. आज आपण Blade V50 Design 5G स्मार्टफोनचे खास फीचर्स जाणून घेऊयात.
6.6 इंच डिस्प्ले –
Blade V50 Design 5G या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच IPS LCD डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1080×2408 पिक्सल असून 90 हर्टज रिफ्रेश रेट सह उपलब्ध आहे. त्याचबरोबर डिस्प्ले ची डेन्सिटी 400PPI एवढी असून स्मार्टफोन 3 कलर ऑप्शन मध्ये हा उपलब्ध आहे. यामध्ये स्काय ब्ल्यू, स्टारि ग्रे, ग्रे मॅट हे कलर्स देण्यात आले आहेत.
4500mAh बॅटरी-
Blade V50 Design 5G या स्मार्टफोनमध्ये 12nm प्रोसेसर देण्यात आले असून Unison Tanggula T760 चिप सेट देखील उपलब्ध आहे. हा Android 13 बेस्ड Tiramisu ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतो. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आलेली असून ती 22.5w वर फास्ट चार्जिंग होते. Blade V50 Design 5G या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी डेटा सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलेले आहे. एवढच नाही तर मेमरी कार्ड सपोर्ट देखील उपलब्ध आहे.
50 मेगापिक्सलचा कॅमेरा –
या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा असून, या कॅमेराच्या माध्यमातून 1080 पिक्सेल व्हिडिओ रेकॉर्ड करता येऊ शकतो. तसेच दुसरा दोन मेगापिक्सल डेप्थ सेंसर सुद्धा मिळतोय. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी समोरील बाजूला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.
अन्य फीचर्स –
Blade V50 Design 5G या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटी साठी 5G सपोर्टेड ड्युल सिम कार्ड, वायफाय, जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप सी, ब्लूटूथ5.2 सपोर्ट सह उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये फिंगरप्रिंट सेंसर, प्रॉक्सीमिटी, एक्सिलेरोमिटी, कंपास, गायरोस्कोप आणि इन्फ्रारेड सेंसर देण्यात आले आहे. यासोबतच 3.5 एफएम हेडफोन जॅक एफएम रेडिओ देखील उपलब्ध आहे.
किंमत किती?
Blade V50 Design 5G या स्मार्टफोनची किंमत युरोपियन मार्केटमध्ये 210 युरो म्हणजेच इंडियन मार्केटमध्ये 19,300 रुपये एवढी आहे. सध्या या मोबाईल ग्लोबल मार्केट मध्ये लाँच झाला असून भारत अजून लाँच झालेला नाही.