घरबसल्या 10 मिनिटांत मिळवा पासपोर्ट साईज फोटो; सुरु झाली खास सर्व्हिस

टाइम्स मराठी । पासपोर्ट साईज फोटो (Passport Size Photo) हा आपल्याला लागतोच.. मोबाईल मध्ये फोटोचा कितीही भरणा असला तरी शाळा, कॉलेज मध्ये, ओळखपत्रासाठी किंवा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर फार्मवर पासपोर्ट साईज फोटोची गरज लागतेच. त्यासाठी आपण फोटो स्टुडिओत जातो आणि फोटो काढतो. यासाठी आपला वेळही जातो आणि जास्तीचे पैसेही… मात्र आता चिंता करू नका.. क्विक कॉमर्स सर्व्हिस ब्लिंकिटवरून तुम्ही अवघ्या १० मिनिटात पासपोर्ट आकाराचा फोटो मागवू शकता, ते सुद्धा घरबसल्या… त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही.

   

ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर एका पोस्टद्वारे नवीन पासपोर्ट साईज फोटो डिलिव्हरीबाबत माहिती दिली आहे. कंपनी फक्त 10 मिनिटांत तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो तुमच्या घरी पोहोचवेल असा दावा सीईओने केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल, “विसा अर्ज, परीक्षा प्रवेशपत्र किंवा भाडे कराराच्या कागदपत्रांसाठी अचानक पासपोर्ट साइज फोटो लागलतात ना? आता दिल्ली आणि गुरुग्राममधील Blinkit ग्राहकांना 10 मिनिटांत पासपोर्ट फोटो मिळणार आहेत! आम्ही ही नवी सेवा लाँच करण्यास उत्सुक आहोत आणि तुमच्या अभिप्रायाची वाट पाहत आहोत. तुमच्या सुचनेनुसार आम्ही या सेवेत सुधारणा करत राहू. हे फोटो घरबसल्या कसे मिळवायचे याचाय स्टेप्स सुद्धा त्यांनी आपल्या ट्विट मधून सांगितल्या आहेत.

Blinkit वरून पासपोर्ट आकाराचा फोटो घरी बसून कसा मागवायचा

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये ब्लिंकिट ॲप ओपन करा.

नंतर सर्च बारमध्ये पासपोर्ट फोटो टाइप करून सर्च करा.

यानंतर तुम्हाला Print Store वर क्लिक करावे लागेल.

येथे अपलोड फाइल्सवर जा आणि तुमच्या फोनमध्ये असलेला पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा.

ब्लिंकिट आपोआप तुमच्या फोटोचा आकार बदलेल आणि त्याचे बॅकग्राऊंड सेव्ह करेल.

पासपोर्ट साइज फोटोसाठी तुम्ही 8, 16 आणि 32 चा पर्याय निवडू शकता.

ऑर्डर झाल्यानंतर फक्त 10 मिनिटांत फोटो तुमच्या घरी पोहोचवले जातील. मात्र सध्या ही सेवा फक्त दिल्ली आणि गुरुग्राममधील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.