एका मेसेजवर ब्लॉक करा तुम्हाला येणारे Spam Call; कसे ते पहा

टाइम्स मराठी । दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर वाढला आहे. या स्मार्टफोन शिवाय आज-काल कोणतेही काम करणे अशक्य आहे. बँकिंग असो, पैसे ट्रान्सफर करणे, फॉर्म भरणे, व्हिडिओ एडिट करणे, फोटोस कॅप्चर करणे, एडिट करणे, डॉक्युमेंट शेअरिंग, मेसेज फॉरवर्डिंग, ऑफिशियल, पर्सनल या  प्रकारची सर्व कामे मोबाईलच्या माध्यमातून केली जातात. स्मार्टफोनचा हा वाढलेला वापर  फायदेशीर आहे. परंतु बऱ्याचदा स्मार्टफोनच्या माध्यमातून  आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. कोरोना काळापासून स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणे वाढला आहे. कारण या काळामध्ये ऑनलाइन पद्धतीने स्मार्टफोनच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा सुरू झाली. बऱ्याचदा तुमच्या स्मार्टफोनवर प्रमोशनल कॉल्स किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कॉल येत असतील. किंवा मीटिंगमध्ये असल्यावर देखील गरज नसलेले कॉल येतात. या कॉल मुळे सततचा त्रास आणि चिडचिड होत असते. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला येणारे स्पॅम कॉल तुम्ही घरबसल्या  ब्लॉक करू शकतात. म्हणजेच तुम्हाला यानंतर असे कॉल येणार नाहीत. आणि तुमची चिडचिड देखील होणार नाही.

   

स्मार्टफोनवर येणारे हे स्पॅम कॉल थांबवण्यासाठी प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये एक सेटिंग दिली जाते. या सेटिंग च्या माध्यमातून स्पॅम कॉल येणे थांबू शकते. एवढेच नाही तर  तुम्ही Vodafone Idea, जिओ आणि Airtel सिम कार्ड युज करत असाल तर तुम्ही थेटपणे एका टेक्स्ट मेसेज वर तुम्हाला येणारे स्पॅम कॉल ब्लॉक करू शकता. त्यासाठी तुम्हाला पुढील प्रोसेस करावी लागेल.

या प्रोसेसने स्पॅम कॉल करा ब्लॉक

स्पॅम कॉल ब्लॉक करण्यासाठी सर्वात अगोदर मोबाईल फोनच्या मेसेज बॉक्स मध्ये जा.
मेसेज बॉक्स मध्ये गेल्यानंतर 1909 या नंबर वर  FULLY BLOCK हा टेक्स्ट तुम्हाला मोठ्या अक्षरात लिहावा लागेल.
त्यानंतर या नंबर वर मेसेज सेंड करा.
तुम्ही हा मेसेज पाठवल्यानंतर काही वेळाने टेलिकॉम ऑपरेटर कडून तुम्हाला एक मेसेज येईल.
या मेसेज मध्ये तुम्हाला  DND म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब सेवा सक्रिय झाल्याचे समजेल.
हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला कोणत्याच स्पॅम कॉल ला सामोरे जावे लागणार नाही.