Blue Moon 2023 :’या’ दिवशी भारतात दिसणार ब्लु मुन; चंद्राच्या आकारात होणार मोठा बदल

टाइम्स मराठी (Blue Moon 2023) । चांद्रयान 3 मुळे प्रत्येकाचे लक्ष्य हे अवकाशात घडणाऱ्या घटनावर आहे. यासोबतच बऱ्याचदा अवकाशात वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली जाणवतात. सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे आपण बऱ्याचदा पाहत असतो. यानुसार आता ऑगस्ट महिन्यात दोन वेळेस चंद्र दिसणार आहे. पहिला चंद्र हा एक ऑगस्टला सुपरमून म्हणून आपण पाहिला होता. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा ब्ल्यू मून दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा ब्ल्यू मून रोज दिसणाऱ्या चंद्राच्या आकृती पेक्षा सर्वात मोठा असेल.

   

किती वाजता दिसणार ब्लु मुन – (Blue Moon 2023)

शास्त्रज्ञांच्या मते, ब्ल्यू मून हा ESD एस्टर डे टाईम नुसार 30 ऑगस्टला रात्री 9.35 मिनिटांनी दिसणार आहे. तर भारतीय वेळेनुसार हा चंद्र 31 ऑगस्टला 1 वाजून 35 मिनिटांनी दिसेल. यासोबतच सकाळी 7.5 मिनिटांनी हा ब्ल्यू मून अंतिम टप्प्यात असेल. ब्ल्यू मून चा अर्थ निळा चंद्र असा होत नाही तर ब्ल्यू मून चा अर्थ रोज पेक्षा मोठया आकारात दिसणारा आणि या सोबतच महिन्यातून दोनदा येणारा चंद्र. ज्या दिवशी सर्वात मोठा मून दिसेल, तेव्हा तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. या ब्ल्यू मूनला (Blue Moon 2023) सुपरमून देखील म्हटले जाते. एका वर्षामध्ये 4 सुपरमून दिसणार आहेत. यापैकी 3 जुलैला आणि 1 ऑगस्टला हा मून दिसला असून 31 ऑगस्ट आणि 29 सप्टेंबरला पुन्हा एकदा सुपरमुन दिसेल.असं नासाचे सेवानिवृत्त खगोल भौतिकीविद फ्रेड एस्पानक यांनी सांगितलं.

वैदिक शास्त्रानुसार पोर्णिमेला चंद्र हा 16 कलेने परिपूर्ण असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सर्वसाधारण दिवसांपेक्षा मोठा आणि चमकदार दिसतो. त्याच प्रकारे सुपरमून देखील अशाप्रकारेच दिसतो. ज्योतिष शास्त्रानुसार ब्ल्यू मून किंवा महिन्यातून दोनदा पौर्णिमा येणे हे शुभ मानले जाते. यामुळे ध्येय पूर्ण करण्यासाठी फायदा होऊ शकतो. सुपरमून सकारात्मक ऊर्जेसह आपल्या जीवनात प्रकाश देखील देऊ शकतो. या काळात व्यक्ती त्यांच्या कामांमध्ये जास्त लक्ष देऊ शकतील. असं ज्योतिष शास्त्रांचा दृष्टिकोन आहे.