Blue Moon : उद्या चंद्र असणार पृथ्वीच्या सर्वात जवळ; आकाशात दिसणार अद्भुत दृश्य

टाइम्स मराठी । 30 ऑगस्टला रक्षाबंधन दिवशी आकाशात सुपरमून (Super Moon) आणि ब्ल्यू मून (Blue Moon) दिसणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 27 आणि 28 ऑगस्टला अवकाशात सुंदर असा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ होता. आता 30 ऑगस्टला रक्षाबंधन असतानाच आकाशामध्ये अद्भुत दृश्य दिसेल. गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रावर भारताचे विक्रम लँडर लँड करण्यात आले आहे. त्याचवेळी आपल्याला ब्ल्यू सुपरमून बघायला मिळेल. हा ब्ल्यू मुन म्हणजे निळ्या रंगाचा चंद्र नसून आकाराने सर्वात मोठा आणि नारंगी रंगांचा चंद्र या दिवशी दिसतो.

   

एखादी दुर्मिळ घटना घडणार असेल तेव्हा ब्ल्यू मून असं म्हंटल जातं. ज्योतिष शास्त्रानुसार ब्ल्यू मून किंवा महिन्यातून दोनदा पौर्णिमा येणे हे शुभ मानले जाते. यामुळे ध्येय पूर्ण करण्यासाठी फायदा होऊ शकतो. सुपरमून सकारात्मक ऊर्जेसह आपल्या जीवनात प्रकाश देखील देऊ शकतो. या काळात व्यक्ती त्यांच्या कामांमध्ये जास्त लक्ष देऊ शकतील. असं ज्योतिष शास्त्रांचा दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या वातावरणानुसार चंद्राच्या रंगांमध्ये बदल होत असतो. बऱ्याच ठिकाणी हा ब्ल्यू मून पांढराशुभ्र दिसेल तर काही ठिकाणी लाल रंगाचा किंवा नारंगी देखील दिसू शकतो.

चंद्र हा पृथ्वीपासून नेहमीपेक्षा जास्त जवळ असल्यास ब्ल्यू सुपरमुन आकाशात दिसणार असल्याचं म्हटलं जातं. ही एक खगोलीय घटना आहे. दोन-तीन वर्षानंतर हा योग येत असल्याचं सांगण्यात येत आहे. वैदिक शास्त्रानुसार पोर्णिमेला चंद्र हा 16 कलेने परिपूर्ण असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सर्वसाधारण दिवसांपेक्षा मोठा आणि चमकदार दिसतो. त्याच प्रकारे सुपरमून देखील अशाप्रकारेच दिसतो. सुपर मून किंवा ब्ल्यू मून ही एक अद्भुत घटना आहे. जेव्हा वार्षिक कॅलेंडरच्या महिन्यांमध्ये दोन वेळेस चंद्रमा दिसेल किंवा दोन वेळेस पौर्णिमा येईल तेव्हा ब्ल्यू मून किंवा सुपरमून म्हटला जातो. ब्ल्यू मून चा अर्थ निळा रंगाचा चंद्र नसून एक दुर्मिळ घटना आहे. एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास ब्ल्यू मून किंवा सुपरमून असल्याचे सांगण्यात येतं.

एका वर्षात दिसतात 4 सुपरमून

या महिन्यामध्ये एक ऑगस्टला सुपर मुन दिसला होता. त्यानंतर आता 31 ऑगस्टला हा दुसरा सुपरमॅन दिसणार आहे. हा ब्ल्यू मून रोज दिसणाऱ्या चंद्राच्याआकृती पेक्षा सर्वात मोठा असेल. ज्या दिवशी सर्वात मोठा मून दिसेल, तेव्हा तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. या ब्ल्यू मूनला सुपरमून देखील म्हटले जाते.